शहरे लॉक, तरीही लॉकडाऊनमध्ये काय सुरू आहे गुन्हेगारी जगतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 12:56 PM2020-07-12T12:56:36+5:302020-07-12T13:16:34+5:30

दिवसाढवळ्या शेतात मद्यपार्टी, तरीही पोलीस गाफिल

Cities locked, crime only open! | शहरे लॉक, तरीही लॉकडाऊनमध्ये काय सुरू आहे गुन्हेगारी जगतात

शहरे लॉक, तरीही लॉकडाऊनमध्ये काय सुरू आहे गुन्हेगारी जगतात

Next

जळगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनान जळगाव, भुसावळ व अमळनेर ही तीन शहरे कडक लॉक केले आहेत. या तीन शहरांमध्ये प्रत्येक रस्ता, प्रभागात पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे, असे असतानाही जळगाव व भुसावळ शहरात गुन्हे मात्र ओपन असल्याचे दिसून आले. शिवाजी नगरातील भुरे मामलेदार धनाजी काळे नगराच्या समोर शेतात दिवसाढवळ्या मद्य पार्टी झाली, त्यानंतर तेथेच गोळीबार झाला. या घटनेच्या आदल्या दिवशी भुसावळ शहरात आंंबेडकर नगरात एका तरुणावर गोळीबार झाला. या घटना घडत असताना शहरे खरच लॉक आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
शिवाजी नगरात गोळीबार प्रकरणी पोलिसांनी माजी महापौर अशोक सपकाळे यांच्या मुलासह चौघांना पकडले. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुल पकडण्यात आले. हे चारही तरुण शेतात रोज मद्यपार्टी करतात असे रहिवाशांचे म्हणणे आहे. लॉकडाऊन असताना त्यांना मद्य कुठून मिळाले, दिवसाढवळ्या पार्टी होत असताना हा प्रकार पोलिसांना दिसू नये हे आश्चर्य आहे. कारण या रस्त्यावर पोलीस व जनतेचा सारखा वावर असतो. भुसावळ शहरातदेखील गुरुवारी रात्री आंबेडकर नगरात आदीत्य संजय लोखंडे (१९) या तरुणावर गोळीबार झाला. हे शहरदेखील लॉक करण्यात आले आहे. लॉक असलेल्या शहरातच पिस्तुल बाहेर निघायला लागलेत. याचा अर्थ येथील गुन्हेगारांना लॉकडाऊनचे गांभीर्य नाही आणि यंत्रणेचा त्यांच्यावर वचक नाही.
गेल्या दोन दिवसात शहरात गोलाणी मार्केटमध्ये अल्पवयीन मुलीवर भरदिवसा बलात्कार झाला तर त्याच्या आदल्या दिवशी शिरसोली रस्त्यावर कन्नड येथून भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनाला दुचाकी आडव्या लावून चाकुचा धाक दाखवून लुटण्यात आले. हे दोन्ही गुन्हे उघडकीस आले असले तरी लॉकडाऊनमध्येच गुन्हे ओपन होत असल्याचे दिसून येत आहे.
भुसावळात पकडले दोन पिस्तुल
भुसावळ शहरातील आंबेडकर नगरात गोळीबार झाल्यानंतर दोन दिवसांनी अर्थात शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टिंबर मार्केटमध्ये एका तरुणाजवळून दोन पिस्तुल पकडले. आकाश गणेश राजपूत (२१, नारायण नगर, भुसावळ) याला अटक केली. त्याच्याजवळून ६० हजार रुपये किमतीचे दोन पिस्तुल जप्त करण्यात आले. शरीफोद्दीन काझी, युनुस शेख, रणजीत जाधव व अरुण राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली. ही कारवाईदेखील लॉकडाऊनमध्येच व लॉक असलेल्या भुसावळ शहरातच झाली.

Web Title: Cities locked, crime only open!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव