शहरे लॉक, कोरोना मात्र सुसाट ; एका दिवसात सर्वाधिक २९२ रूग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 19:19 IST2020-07-09T19:19:34+5:302020-07-09T19:19:44+5:30
जळगाव : जळगाव , भुसावळ व अमळनेर या तीन शहरांमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ...

शहरे लॉक, कोरोना मात्र सुसाट ; एका दिवसात सर्वाधिक २९२ रूग्ण आढळले
जळगाव : जळगाव, भुसावळ व अमळनेर या तीन शहरांमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, या शहरांसह जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून जळगाव शहरात ८२ कोरोना रूग्णांसह जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल २९२ नवे रूग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान, आता ५ हजार ३०२ इतकी कोरोना बाधित रूग्णांची संख्या आहे. त्यातील ३ हजार ७९ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तर ३०९ जणांचा मृत्यू झाला आहे.
अशी आहे नवीन रूग्ण संख्या
जळगाव शहरात ८२, जळगाव ग्रामीण २०, भुसावळ १८, अमळनेर १२, पाचोरा व भडगाव प्रत्येकी ०१, धरणगाव ०४, यावल १४, एरंडोल १७, जामनेर ३३, रावेर ०८, पारोळा १४, चाळीसगाव १७, मुक्ताईनगर ३१, बोदवड १९ व दुसऱ्या जिल्ह्यातील ०१ अशी गुरूवारी आढळून आलेली कोरोना बाधित रूग्ण संख्या आहे.