चोपड्यात गरजूंपर्यंत वस्तू पोहोचवताहेत दाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 20:23 IST2020-04-05T20:23:14+5:302020-04-05T20:23:28+5:30
दाते सामाजिक कार्यकर्त्यामार्फत जीवनावश्यक वस्तू पाठवून त्यांची गरज भागवत आहेत.

चोपड्यात गरजूंपर्यंत वस्तू पोहोचवताहेत दाते
चोपडा, जि.जळगाव : शहरातील दाते सामाजिक कार्यकर्त्यामार्फत जीवनावश्यक वस्तू पाठवून त्यांची गरज भागवत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते सागर बडगुजर, आर.डी.पाटील हे गावात गरजूंना त्यांच्या घरी, वस्त्यांमध्ये जावून मदत पोहोचवत आहेत. राजेश्वर प्लॅस्टिक, यशु बडगुजर, आनंद जैन, गौरव महाले, राजस्थान मार्बल, हर्षदा पराग पाटील आदी दाते जीवनावश्यक वस्तू सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचतात. नंतर पुढे ही मदत गरजूंपर्यंत जात आहे.
विविध दात्यांच्या सहकार्याने आतापर्यंत किमान १०० किटचे वाटप तहसीलदार अनिल गावित, एपीआय मनोज पवार व कॉन्स्टेबल विलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनानुसार गरजूपर्यंत करण्यात आले आहे.