तरुणाच्या पोटात खुपसला चॉपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 23:56 IST2020-09-07T23:56:03+5:302020-09-07T23:56:26+5:30

जळगाव : शिवाजी नगरातील हुडकोत दोन तरुणांना मारहाण झाल्यानंतर समझोता करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्याच पोटात चॉपर खुपसल्याची घटना रविवारी रात्री ...

Chopper stuck in the young man's stomach | तरुणाच्या पोटात खुपसला चॉपर

तरुणाच्या पोटात खुपसला चॉपर

जळगाव : शिवाजी नगरातील हुडकोत दोन तरुणांना मारहाण झाल्यानंतर समझोता करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्याच पोटात चॉपर खुपसल्याची घटना रविवारी रात्री घडली. या घटनेत रितेश जितेंद्र पवार (रा.गेंदालाल मील) हा जखमी झाला असून याप्रकरणी पाच जणांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गेंदालाल मिल परिसरातील लकी जितेंद्र पवार हा त्याचा मावस भाऊ आर्यशील उर्फ सोनू दिलीप अहिरे हे दोघ शिवाजीनगर हुडको भागात बिर्याणी खाण्यासाठी गेले होते. तेथे चिन्या याने या दोघांना तुम्ही याठिकाणी मुली बघण्यासाठी येता का? असे म्हणत चिन्या व त्याची पत्नी टिनाबाई, मुलगा साई यांच्यासह दोन जणांनी त्या दोघांना शिवीगाळ करुन त्यांना मारहाण केली. नंतर दोघांनी घडलेली सर्व घटना लकी याचा मोठा भाऊ रितेश याला सांगितली. रितेश याने त्या दोघांसह त्यांच्या गल्लीतील गजानन वाघ, सागर वाघ व बंटी नामक तरुणांना सोबत घेवून तो शिवाजीनगर गाठले. तेथे बबल्या नामक युवकाने खिशातील चॉपर काढून रितेश याच्या पोटात खुपसून त्याच्या हातावर वार केले.

Web Title: Chopper stuck in the young man's stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव