चिंचखेडा बु. येथे कुलूप तोडून धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:13 IST2021-06-20T04:13:55+5:302021-06-20T04:13:55+5:30

याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, दि. १८ रोजी रात्री साडेनऊ वाजता सदाशिव सीताराम पाटील (चिंचखेडा बु.) हे ...

Chinchkheda Bu. Brave theft by breaking the lock here | चिंचखेडा बु. येथे कुलूप तोडून धाडसी चोरी

चिंचखेडा बु. येथे कुलूप तोडून धाडसी चोरी

याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, दि. १८ रोजी रात्री साडेनऊ वाजता सदाशिव सीताराम पाटील (चिंचखेडा बु.) हे नेहमीप्रमाणे घरातील दरवाजे, खिडक्या, मुख्य दारास कुलूप लावून पोर्चमध्ये पत्नीसह झोपले होते. पत्नीने कुलुपाची चावी उशीच्या खोळामध्ये लपवून उशी डोक्याखाली घेऊन नेहमीप्रमाणे झोपले. पहाटे चारच्या सुमारास झोपेतून उठलो असता दरवाजाचे कुलूप तोडून पोर्चमध्ये फेकलेले आढळले. तत्काळ पतीपत्नी दोघांनी घरात प्रवेश करून पाहिले असता कपाटातील ड्रॉवर बाजूला दिसले.

त्यातील सोन्याचे दागिने लंपास झाल्याचे आढळले. यात १ लाख ८० हजारांचे सोन्याचे दागिने व शंभर, पाचशेच्या नोटा असलेली रु. १ लाख ७० हजार रोख रक्कम चोरीस गेल्याचे दिसून आले. यावेळी दागिन्याचे खोके बाजूला फेकलेले आढळले. अज्ञात चोरट्यांनी बंद दरवाजाचे कुलूप उघडून चोरी केल्याचे दिसून आले. यावरून सदाशिव सीताराम पाटील यांच्या फिर्यादीनुसार पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Chinchkheda Bu. Brave theft by breaking the lock here