यावलमध्ये ट्रॅक्टर अंगावर गेल्याने बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 21:00 IST2018-11-20T20:59:24+5:302018-11-20T21:00:07+5:30
यावल शहरातील नवीन वस्ती असलेल्या हरिओम नगरच्या शेजारी उभे केलेले ट्रॅक्टर अचानक मागे सरकल्याने खेळत असलेल्या नऊ वर्षीय बालकाच्या अंगावरून गेल्याने बालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.

यावलमध्ये ट्रॅक्टर अंगावर गेल्याने बालकाचा मृत्यू
यावल, जि.जळगाव : शहरातील नवीन वस्ती असलेल्या हरिओम नगरच्या शेजारी उभे केलेले ट्रॅक्टर अचानक मागे सरकल्याने खेळत असलेल्या नऊ वर्षीय बालकाच्या अंगावरून गेल्याने बालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.
शहरातील हरिओम नगरच्या शेजारी आदिवासी पावरा समाजाची छोटीशी वस्ती आहे. या ठिकाणी काही कुटुंबियांचा रहिवास आहे. माजी नगरसेवक देवराम राणे यांच्या शेताजवळ मंगळवारी सायंकाळी एक ट्रॅक्टर लावलेले होते. त्या ट्रॅक्टरच्या आजूबाजूला बालके खेळत होती.
दरम्यान, साडेचार वाजेच्या सुमारास लावलेले ट्रॅक्टर अचानक मागे सरकले. तेव्हा या ट्रॅक्टरजवळ खेळत असलेल्या बालकांपैकी शिवलाल बुधा बारेला (वय नऊ वर्षे) याच्या अंगावर ट्रॅक्टर गेले. ते बालकाच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. त्यास येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणले. मात्र तत्पूर्वी त्याचे निधन झाले. घटना समजल्यावर त्यांच्या नातलगांनी त्यास तत्काळ ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत रात्री उशिरा पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.