शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
7
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
8
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
9
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
10
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
11
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
12
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
13
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
14
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
15
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
16
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
17
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
18
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
19
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
20
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 

खडके येथील बालगृहाचे विभागीय स्पर्धांमध्ये यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 3:45 PM

खडके येथील बालगृहातील विद्यार्थ्यांचे विभागीय स्तरात चमकदार कामगिरी केली.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी नोंदविला विविध स्पर्धांमध्ये सहभागचमकदार कामगिरी अन् बक्षिसेही

कवठळ, ता.धरणगाव, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या खडके येथील बालगृहातील विद्यार्थ्यांचे विभागीय स्तरात चमकदार कामगिरी केली.महिला व बालविकास विभाग विभागीय उपायुक्त आयोजित विभागीय स्तर चाचा नेहरू बालमहोत्सव ९ व १० रोजी पार पडला. त्यात बालगृह खडके बुद्रूक या संस्थेतील चिमुकल्यांनी यश संपादन केले. मोठ्या गटातील लाभार्थी हेमंत सुनील कोळी याने विभागीय स्तरावर बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. तसेच कविता वाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक तर निरंक दिनेश सोनवणे याने कॅरम स्पर्धेत व्दितीय क्रमांक पटकावला.लहान गटात किशोर राजेंद्र वानखेडे याने कॅरम स्पर्धेत व्दितीय क्रमांक आणि चित्रकला स्पर्धेतही व्दितीय क्रमांक मिळवला. बुद्धिबळ व कॅरमसाठी माजी प्रवेशित ॠषीकेश ठाकरे याने मेहनत घेतली.मुलींच्या बालगृहातील लाभार्थी अंजली गाढे ही शुध्दलेखन स्पर्धेत लहान गटात प्रथम, तर सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत द्वितीय आली. देविका परशुराम गायकवाड लहान गटातून निबंध स्पर्धेत व्दितीय आली. रुचिका गायकवाड चित्रकला स्पर्धेत तृतीय आली.सामूहिक नृत्य प्रकारात लहान गटात ‘पापा मेरे पापा...’ या नृत्यास प्रथम क्रमांक मिळाला. त्यात पायल गर्दे, अंजली गाढे, देविका गायकवाड, रूचिता गायकवाड, कुसुम पाटील, ममता पाटील यांचा सहभाग होता.चिमुकल्यांचे विभागीय उपआयुक्त सुरेखा पाटील यांनी पारितोषिक व प्रमाणपत्र देवून सन्मानित केले. यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्रभाकर यशवंत पाटील यांनी सर्व मुलांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करणारे अधीक्षक मधुकर कपाटे, प्रमोद पाटील, तुषार अहिरे, गणेश पंडित, ज्ञानेश्वर पाटील, ॠषीकेश ठाकरे, सारिका पाटील यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :SchoolशाळाDharangaonधरणगाव