मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड येथे साजरा होतोय बालिकांचा वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 17:51 IST2018-12-21T17:49:13+5:302018-12-21T17:51:23+5:30
मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड येथे जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समिती चेअरमन लक्ष्मण चौके यांनी ‘बेटी बचाव बेटी पढाव’ उपक्रमांतर्गत बालकांचा वाढदिवस साजरा करण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड येथे साजरा होतोय बालिकांचा वाढदिवस
मुक्ताईनगर, जि.जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड येथे जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समिती चेअरमन लक्ष्मण चौके यांनी ‘बेटी बचाव बेटी पढाव’ उपक्रमांतर्गत बालकांचा वाढदिवस साजरा करण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. पश्चिम बंगालचे आयपीएस अधिकारी कुलदीप सोनवणे यांच्या उपस्थितीत हा पहिला उपक्रम सुरू करण्यात आला.
मुलींनी शिक्षणासाठी पुढे यावे व शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशातून हा उपक्रम जिल्हा परिषद शाळेत सुरू करण्यात आला आहे. याप्रसंगी कुलदीप सोनवणे, एन.जी.शेजोळे, पंढरी पाटील, सचिन पाटील, सचिन वारूळकर, राहुल पाटील, सूरज चौके, रवींद्र पाटील, सागर पाटील, अजय चौके, पंकज कौरे व शिक्षक उपस्थित होते.
आयपीएस अधिकारी कुलदीप सोनवणे हे मूळचे पुरनाड येथीलच आहेत. गेल्या २०१७ च्या बॅचमध्ये ते संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आयपीएस अधिकारी झाले आहेत. त्यांची नेमणूक सध्या पश्चिम बंगालमध्ये करण्यात आलेली आहे. याप्रसंगी त्यांचादेखील शाळा व्यवस्थापन समितीतर्फे गौरव करण्यात आला.