शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

महापारेषणच्या जळगाव जिल्ह्यातील चार प्रस्तावित उपकेंद्रांचे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ई-भूमिपूजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 20:27 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या जिल्ह्यातील प्रस्तावित चार उपकेंद्रांचे ई-भुमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (ता.30) सकाळी साडेदहा वाजता 660 मेगावॅट महानिर्मिती प्रकल्प, दीपनगर, भुसावळ येथे होणार आहे.

 जळगाव - महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या जिल्ह्यातील प्रस्तावित चार उपकेंद्रांचे ई-भुमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (ता.30) सकाळी साडेदहा वाजता 660 मेगावॅट महानिर्मिती प्रकल्प, दीपनगर, भुसावळ येथे होणार आहे.     यामध्ये जामनेर तालुक्यातील 220 के.व्ही.उपकेंद्र, केकतनिंभोरा, यावल तालुक्यातील 220 के.व्ही.उपकेंद्र विरोदा, भडगाव तालुक्यातील 132 के.व्ही.उपकेंद्र कोठली, मुक्ताईनगर तालुक्यातील 132 के.व्ही.उपकेंद्र कर्की (पुर्नाड) या प्रस्तावित उपकेंद्रांचा समावेश आहे. या उपकेंद्रांचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील हे उपस्थित राहणार आहेत.     यावेळी विशेष अतिथी म्हणून कृषी, फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, ऊर्जा व नवीन व नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा पर्यटन, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्ज्वलाताई पाटील उपस्थित राहणार आहेत.     कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार ए. टी. (नाना) पाटील, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, आमदार सर्वश्री. डॉ. सुधीर तांबे, डॉ. अपूर्व हिरे, श्रीमती स्मिताताई वाघ, श्री. चंदुभाई पटेल, एकनाथराव खडसे, डॉ. सतीश पाटील, संजय सावकारे, हरिभाऊ जावळे, चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, शिरीषदादा चौधरी, उन्मेष पाटील, किशोर पाटील उपस्थित राहणार आहे. तर  कार्यक्रमासाठी प्रधान सचिव (ऊर्जा) श्री. अरविंद सिंह,  महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव कुमार मित्तल, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर,   रवींद्र चव्हाण, संचालक (प्रकल्प, महापारेषण) उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावChief Ministerमुख्यमंत्री