Chief Minister to review district development on 2nd | मुख्यमंत्री ३० रोजी घेणार जिल्हा विकासाचा आढावा
मुख्यमंत्री ३० रोजी घेणार जिल्हा विकासाचा आढावा

जळगाव : नाशिक महसूल विभागातील जिल्ह्यांच्या विकास कामांबाबत तसेच विविध समस्यांबाबतची आढावा बैठक ३० जानेवारी रोजी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यात दुपारी ३ वाजता जिल्ह्यातील ७ विभागांशी संबंधीत योजना व विकासाबाबतच्या अडचणींचा आढावा घेतला जाणार आहे.
या बैठकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधीत विभागांकडून माहिती मागविण्यात येत आहे. ही माहिती २८ तारखेपर्यंत मुख्यमंत्री कार्यालयास पाठविण्यात येणार आहे.
अधिकाऱ्यांसोबत आमदारांचीही उपस्थिती
या आढावा बैठकीला अधिकाऱ्यांसह जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १ वाजता धुळे जिल्हा, दुपारी ३ वाजता जळगाव, दुपारी ४.१५ वाजता नंदुरबार, सायंकाळी ५.३० वाजता अहमदनगर तर सायंकाळी ६.४५ वाजता नाशिक जिल्ह्याचा आढावा घेण्यात येणार आहे.

Web Title:  Chief Minister to review district development on 2nd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.