शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
2
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
3
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
4
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
5
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
6
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
7
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
8
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
9
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
10
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
11
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
12
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
13
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
14
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
15
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
16
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
17
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
18
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
19
IND vs SA 2nd Test Day 3 Stumps : बावुमानं टीम इंडियाला फॉलोऑन देणं टाळलं; कारण...
20
नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री तर सोडा, पालकमंत्र्यांनाही वेळ नाही : जळगावातील बंदिस्त नाट्यगृहाचे उद्घाटन पुन्हा लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 12:39 IST

लांडोरखोरी पाठोपाठ आता नाट्यगृहही त्याच वाटेवर

ठळक मुद्देतातडीने ठरला होता कार्यक्रम‘छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर’ नामकरण

जळगाव : महाबळ रस्त्यावरील मायादेवीनगरात नव्यानेच बांधण्यात आलेल्या बंदिस्त नाट्यगृहाच्या तळघराच्या छताला गळती लागली आहे. त्याच्या स्ट्रक्चरल आॅडीटचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच वॉटर प्रुफींग करून व कुंपणभिंतीनजीक गटार बांधून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शनिवार, ११ आॅगस्ट रोजी उद्घाटनाचा घाट घातला जात होता. मात्र पालकमंत्र्यांचा दौराच रद्द झाल्याने उद्घाटन लांबणीवर पडले आहे.यापूर्वी वनमंत्र्यांची तारीख मिळत नसल्याने ‘लांडोरखोरी’ उद्यानाचे उद्घाटन लांबणीवर पडले होते. ‘लोकमत’ने हा विषय लावून धरल्यावर पालकमंत्र्यांनीच हे उद्घाटन उरकले होते. आता तर बंदिस्त नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना आणायचे म्हणून उद्घाटन लांबले. आता पालकमंत्र्यांना देखील उद्घाटनासाठी वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे.स्ट्रक्चरल आॅडीट अपूर्ण असताना उद्घाटनाचा बेतवास्तविक बंदिस्त नाट्यगृहाचे काम रखडल्याने त्याचे उद्घाटनही लांबणीवर पडत गेले. मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्यानेही काही महिने उद्घाटन लांबले. दरम्यान पावसाळ्याला सुरूवात होताच तळघराला गळती लागल्याचे उघड झाल्यानंतर व ‘लोकमत’ने हा विषय लावून धरला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी या बंदिस्त नाट्यगृहाच्या संपूर्ण इमारतीचे पुन्हा स्ट्रक्चरल आॅडीट करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यानुसार मुंबईच्या श्रीखंडे अ‍ॅण्ड कंपनीचे पथक येऊन पाहणी करून गेले. प्राथमिकदृष्ट्या इमारतीला धोका नसल्याचे त्यांनी सांगितले असल्याचा दावा अधिक्षक अभियंता यांनी केला आहे. मात्र अंतिम अहवाल येणे बाकी आहे. त्यातच बाजूचे पाणी पाझरून येत असल्याचा दावा बांधकाम विभागाने पूर्वी केला होता. मात्र कुंपणभिंतीच्या बाजूने खोदून पाहिले असता खाली माती कोरडी असल्याचे आढळून आले. त्यामुळे भूगर्भातूनच पाणी वर येत असल्याचा अंदाज व्यक्त करीत भूजल सर्वेक्षण विभागाचे मतही स्ट्रक्चरल आॅडीट करणाऱ्या कंपनीकडून घेतले जाणार असल्याचे अधीक्षक अभियंता यांनी सांगितले होते. मात्र त्यापूर्वीच तळघराचे थातूरमातूर वॉटर प्रफुींग व कुंपणभिंतीच्या बाजूने मोठी गटार बांधून उपाययोजना केल्याचे दर्शविले जात असून स्ट्रक्चरल आॅडीटचा अहवाल येण्यापूर्वीच उद्घाटनाची घाई केली जात होती.तातडीने ठरला होता कार्यक्रममुख्यमंत्र्यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर बंदिस्त नाट्यगृहाचे देखील उद्घाटन केले जाणार आहे का? याची विचारणा बुधवार, ८ आॅगस्ट रोजीच ‘लोकमत’ने बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र तशा सूचना आलेल्या नसल्याचे तसेच उद्घाटनापूर्वी संपूर्ण बंदिस्त नाट्यगृहाची साफसफाई करावी लागणार असून त्यासाठी किमान १० दिवस आधी सुरूवात करावी लागेल, असेही स्पष्ट केले होते. असे असताना पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे ऐनवेळी ठरले. त्यामुळे बांधकाम विभागाने संपूर्ण यंत्रणा कामाला लावत सफाई केली. तसेच लायटिंगही करण्यात आली.कार्यक्रमांची रंगीत तालीमउद्घाटन कार्यक्रमासाठी सांस्कृतीक कार्यक्रमांची रंगीत तालीमही शुक्रवारी सुरू होती. त्यात विविध कालावंत सहभागी झाले होते. रात्री उशीरा दौरा रद्द झाल्याचे जाहीर होईपर्यंत रंगीत तालीम सुरू होती.‘छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर’ नामकरणया बंदिस्त नाट्यगृहाला काय नाव द्यावे? हा विषयही काही दिवसांपासून चर्चेत आला होता. त्यानुसार मागण्यांचे निवेदनही देण्यात आले होते. मात्र या नाट्यगृहाला ‘छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर’ असे नामकरण करण्यात आले असून तसे नाव देखील या नाट्यगृहाच्या वास्तूवर दर्शनी भागावर टाकण्यात आले आहे.पंतप्रधानांचा दौरा अन् पालकमंत्र्यांना मुंबईतच थांबण्याच्या सूचनाप्रोटोकॉलनुसार पंतप्रधान यांचे स्वागत मुख्यमंत्री, राज्यपाल तसेच त्या जिल्ह्याचे पालकमंत्री करतात. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा जाहीर झाल्यानंतरही महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर मंत्र्यांना त्यांचे नियमित कार्यक्रम करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळेच पालकमंत्र्यांचा जळगाव दौरा निश्चित करण्यात आला होता. मात्र शुक्रवारी रात्री पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द करून मुंबईतच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे त्यांचा जळगाव दौरा ऐनवेळी रद्द झाला.राजकीय गुपीत काय?आधी बंदिस्त नाट्यगृहाच्या उद्घाटनाचा जाहीर केलेला बेत बदलून पाहणीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. अन् रात्री उशीरा पंतप्रधानांच्या मुंबई दौºयाचे निमित्त करीत दौराच रद्द करण्यात आला. पालकमंत्र्यांच्या बदललेल्या भूमिकेमागील राजकीय गुपित काय? याबाबत उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीJalgaonजळगाव