चेन्नई-जोधपूर व ओखा एक्स्प्रेसच्या मुदतीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST2021-06-19T04:11:49+5:302021-06-19T04:11:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना रुग्ण संख्येचे प्रमाण कमी झाल्यानंतर गेल्या आठवड्यापासून रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. ...

Chennai-Jodhpur and Okha Express extended | चेन्नई-जोधपूर व ओखा एक्स्प्रेसच्या मुदतीत वाढ

चेन्नई-जोधपूर व ओखा एक्स्प्रेसच्या मुदतीत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना रुग्ण संख्येचे प्रमाण कमी झाल्यानंतर गेल्या आठवड्यापासून रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ३० जून रोजी मुदत संपत असलेल्या चेन्नई-जोधपूर व ओखा एक्स्प्रेसच्या मुदतीत वाढ केली आहे. या गाड्या आता नोव्हेंबरपर्यंत धावणार आहेत.

रेल्वे प्रशासनातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षांपासून ५० टक्केच प्रवासी गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. तर आता अनलॉक केल्यानंतरही नवीन गाड्या सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, कोरोना काळात ज्या गाड्या तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्याच गाड्या पुन्हा अनलॉकनंतर प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे त्यांची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या मध्ये चेन्नई एग्मोर जोधपूर विशेष एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०६०६७-६८) ही गाडी धावण्याची ३ जुलैपर्यंत मुदत होती. मात्र, आता या गाडीला ८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच रामेश्वरम ओखा विशेष एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०६७३३-३४) या गाडीला ६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, ही गाडी ५ जुलैपर्यंत धावणार होती. दरम्यान, गुजरात,ओडोसा व पश्चिम बंगाल मार्गावर धावणाऱ्या या गाड्यांना मुदतवाढ देण्यात आल्यामुळे प्रवाशांमधून रेल्वेच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

इन्फो :

या गाड्यांनाही तिकीट आरक्षण सक्तीचे

रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनरल तिकीट काढून प्रवासाला बंदी घातली आहे. फक्त तिकीट आरक्षण असणाऱ्या प्रवाशांनाच गाडीत प्रवेश देण्यात येत आहे. तर आता मुदतवाढ देण्यात आलेल्या विशेष गाड्यांनाही तिकीट आरक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट आरक्षण करूनच प्रवास करण्याचे आवाहन भुसावळ रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Web Title: Chennai-Jodhpur and Okha Express extended