मंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वागतप्रसंगी जळगाव रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, महिला पदाधिकारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 13:18 IST2020-01-01T13:18:21+5:302020-01-01T13:18:40+5:30

मोठी दुर्घटना टळली

Chengarachengari, woman officer injured at Jalgaon railway station | मंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वागतप्रसंगी जळगाव रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, महिला पदाधिकारी जखमी

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वागतप्रसंगी जळगाव रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, महिला पदाधिकारी जखमी

जळगाव : शिवसेनेचे नवनियुक्त मंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वागतप्रसंगी जळगाव रेल्वे स्थानकावरील जिन्यावर चेंगराचेंगरी होऊन दोन महिला पदाधिकारी जखमी झाल्या.
पाटील यांनी शपथ घेतल्यानंतर प्रथमच बुधवारी सकाळी ११ वाजता गुलाबराव पाटील यांचे जळगावला आगमन झाले. शिवसेनेकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी जिन्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन चेंगराचेंगरी झाली. यात महिला पदाधिकारी मंगला बारी, शोभा चौधरी या जखमी झाल्या.

Web Title: Chengarachengari, woman officer injured at Jalgaon railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव