जळगावात ११०० कोटींचे धनादेश व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 23:01 IST2018-05-31T23:01:28+5:302018-05-31T23:01:28+5:30
इंडियन्स बँक्स असोसिएशनतर्फे वेतन करारास विलंब होत असल्याचा आरोप करत युनायटेड फोरम बँक युनियन्सने ३० व ३१ मे रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपात जळगावातही स्टेट बँक आॅफ इंडिया स्टॉफ युनियन सहभागी झाल्याने दोन दिवसात जिल्ह्यातील जवळपास ११०० कोटी रुपयांचे धनादेश न वटल्याने हे व्यवहार ठप्प झाले.

जळगावात ११०० कोटींचे धनादेश व्यवहार ठप्प
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.३१ : इंडियन्स बँक्स असोसिएशनतर्फे वेतन करारास विलंब होत असल्याचा आरोप करत युनायटेड फोरम बँक युनियन्सने ३० व ३१ मे रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपात जळगावातही स्टेट बँक आॅफ इंडिया स्टॉफ युनियन सहभागी झाल्याने दोन दिवसात जिल्ह्यातील जवळपास ११०० कोटी रुपयांचे धनादेश न वटल्याने हे व्यवहार ठप्प झाले. दरम्यान, शहरातील बहुतांश एटीएममध्ये रक्कम नसल्याने ग्राहकांना फिराफिर करावी लागली.
वेतन करार लवकर होण्यासह विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाºयांनी ३० मे पासून संप पुकारला. यामध्ये जवळपास ५००च्यावर कर्मचारी सहभागी झाल्याने बँकांचे व्यवहार ठप्प होऊन दोन दिवस बँक ग्राहकांचे हाल झाले.
या संपामुळे बँक परिसरात दोन दिवस शुकशुकाट होता. जळगाव शहरातील जवळपास ७०० कोटींचे व्यवहार ठप्प होऊन जिल्हाभरातील जवळपास ११०० कोटींचे धनादेश वटू शकले नाही. दोन दिवसात हजारो कोटींचे व्यवहार ठप्प झाल्याने सामान्य ग्राहकांसह व्यापारी, उद्योजक यांना याचा फटका बसला.