पाठलाग करून चोरीच्या गुरांची केली सुटका

By Admin | Updated: May 20, 2017 15:35 IST2017-05-20T15:35:12+5:302017-05-20T15:35:12+5:30

माहिती बजरंग दलाच्या पदाधिका:यांना मिळाल्याने वाहनाचा पाठलाग करून गुरांची सुटका करण्यात आली

Chased out kidnapped cattle | पाठलाग करून चोरीच्या गुरांची केली सुटका

पाठलाग करून चोरीच्या गुरांची केली सुटका

ऑनलाइन लोकमत

पारोळा, जि. जळगाव, दि. 20 - पारोळा तालुक्यातील म्हसवे येथून तीन गुरांची चोरी करून ते वाहनात घेऊन जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या पदाधिका:यांना मिळाल्याने वाहनाचा पाठलाग करून गुरांची सुटका करण्यात आली. ही घटना शनिवारी सकाळी घडली.
युवराज पाटील रा. देवगाव याने 20 रोजी पहाटे म्हसवे, ता पारोळा येथून एका खळवाडीतून दोन गायी, एक  बैल अशा तीन गुरांची चोरी करून ते वाहनातून चाळीसगाव येथे विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती बजरंग दलाचे संयोजक विनोद खाडे यांना  मिळाली. त्या  वेळी त्यांनी  या वाहनाचा पाठलाग करून पकडले. वाहन चालक युवराज पाटीलला विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यास चोप देऊन गुरांसह वाहन पोलीस ठाण्यात आणले. त्या वेळी घटनेचा उलगडा झाला. या वाहनातील गुरांची रवानगी गो शाळेत करण्यात आली. या प्रकरणी चालकासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Chased out kidnapped cattle