जामनेर येथे धर्मार्थ रुग्णालय सेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 14:58 IST2020-02-04T14:55:50+5:302020-02-04T14:58:23+5:30

विश्व हिंदू परिषदेने येथील एकलव्य नगरात धर्मार्थ रुग्णालय सेवा सोमवारपासून सुरू केली आहे.

Charity hospital services started at Jamner | जामनेर येथे धर्मार्थ रुग्णालय सेवा सुरू

जामनेर येथे धर्मार्थ रुग्णालय सेवा सुरू

ठळक मुद्देआदिवासी, गरीब रुग्णांना मिळणार मोफत सेवाशहरातील डॉक्टर्स देतील सेवा

जामनेर, जि.जळगाव : विश्व हिंदू परिषदेने येथील एकलव्य नगरात धर्मार्थ रुग्णालय सेवा सोमवारपासून सुरू केली आहे. विहिंपचे राष्ट्रीय सेवा प्रमुख नंदालाल लोहिया यांच्या हस्ते शुभारंभ झाला. या उपक्रमामुळे आदिवासी गरीब रुग्णांना मोफत आरोग्य सेवा दिली जाणार असल्याची माहिती डॉ.मनोज विसपुते यांनी दिली.
भुसावळ येथे विहिंपचा देवगिरी कॅम्प झाला. यावेळी रुग्णालय सेवेची संकल्पना डॉ.विसपुते यांनी मांडली. एकलव्य नगर हा भाग गरीब, कष्टकरी आदिवासी बांधवांचा आहे. येथे आठवड्यातून एकदा शहरातील डॉक्टर्स मोफत रुग्णसेवा देतील.
शुभारंभाच्या दिवशी ५० मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्हा सहमंत्री गजानन लोणारी, प्रखंडमंत्री प्रवीण सुशीर, गोसेवा प्रमुख गोपाळ बुळे, नंदकुमार दलाल, समाधान महाजन, आशुतोष पाटील, दीपक लोणारी, ईश्वर कोकाटे आदी उपस्थित होते.
धर्मार्थ रुग्णसेवेसाठी डॉ.रवींद्र कासट, डॉ.नरेंद्र कुलकर्णी, डॉ.सचिन पाचंगे, डॉ.अविनाश कुरकुरे व डॉ.विसपुते सहकार्य करणार आहे.

 

Web Title: Charity hospital services started at Jamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.