आडगाव ग्रामसभेत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:18 IST2021-08-26T04:18:46+5:302021-08-26T04:18:46+5:30
ग्रामसभेत अहवालवाचन ग्रामसेवक एच. एम. कोतवाल यांनी केले. यावेळी ग्रामकृषी समिती स्थापन करण्यासंदर्भात विषय सभेत चर्चेत आल्यावर कृषी सहाय्यक ...

आडगाव ग्रामसभेत गोंधळ
ग्रामसभेत अहवालवाचन ग्रामसेवक एच. एम. कोतवाल यांनी केले. यावेळी ग्रामकृषी समिती स्थापन करण्यासंदर्भात विषय सभेत चर्चेत आल्यावर कृषी सहाय्यक यांनी सांगितले की, शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे कृषी समिती स्थापन करावी. त्यात सरपंच व उपसरपंच हे पदसिद्ध असतील. ग्रामपंचायतीचे सदस्यांपैकी पुरुष व महिला दोन सदस्य असतील. सरपंच सुनील भिल यांनी ग्रामकृषी समितीच्या सदस्यांची नावे घोषित करीत असताना डॉ. प्रवीण वाघ यांनी दुसरी यादी घोषित करावी, असा आग्रह केला. परंतु ती यादी नामंजूर करण्यात आली. सभेत काही काळ गोंधळ झाल्याने विविध प्रश्नांचा भडीमार झाला.
वाघ यांनी घेतला काढता पाय
डॉ. वाघ यांनी ग्रामसभेत सहभाग न घेता निघून गेले. ग्रामसमिती व तंटामुक्ती समितीला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. ग्रामसभेत उपसरपंच दिलीप पाटील, कैलास तागड, माजी शेतकी संघ अध्यक्ष उत्तमराव पाटील, पंडित साबळे, प्रल्हाद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ग्राम कृषी समितीत अध्यक्ष सरपंच सुनील भिल, उपसरपंच दिलीप पाटील, सदस्य प्रल्हाद पाटील, सीमा महाजन, सुरेखा महाजन, राजूबाई साबळे, शारदा पाटील, मुक्ताबाई राठोड, वंदना पाटील, कैलास तागड, शांताराम महाजन, तलाठी अनिल सुरवाडे, कृषी सहाय्यक धंनजय सांवत, कृषिमित्र अनंत चौधरी, सरला महाजन यांचा समावेश करण्यात आला. तंटामुक्ती समितीत अध्यक्षपदी डॉ . सुधाकर महाजन, उत्तम परशराम पाटील उपाध्यक्ष, सदस्यपदी पंडित उत्तम साबळे, रमेश हरी पाटील, धनराज शंकर चव्हाण, सुनील हरी साबळे, सुभाष पुंडलिक मोरे, संभाजी गायकवाड, अविनाश पाटील, युवराज साबळे, सतीश महाजन यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य डॉ. सुभाष पाटील, रवींद्र पवार, स्वप्निल पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार उपसरपंच दिलीप पाटील यांनी मानले.