कोरोनाच्या दुष्प्रभावामुळे रेल्वेद्वारे काही गाड्यांंच्या फेरीत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 15:48 IST2020-07-08T15:46:49+5:302020-07-08T15:48:59+5:30
कोरोनाच्या दुष्प्रभावामुळे रेल्वे प्रशासनातर्फे काही गाड्यांच्या फेरीत बदल करण्यात आला आहे. दररोज चालणाºया गाड्या साप्ताहिक करण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या दुष्प्रभावामुळे रेल्वेद्वारे काही गाड्यांंच्या फेरीत बदल
भुसावळ, जि.जळगाव : कोरोनाच्या दुष्प्रभावामुळे रेल्वे प्रशासनातर्फे काही गाड्यांच्या फेरीत बदल करण्यात आला आहे. दररोज चालणाºया गाड्या साप्ताहिक करण्यात आल्या आहेत.
१० जुलैपासून गाडी क्र. ०२८३४ अप हावडा- अहमदाबाद विशेष गाडी प्रत्येक शुक्रवारी हावडा स्थानकावरून २३:५५ वाजता प्रस्थान करेल. रविवारी अहमदाबाद स्थानकावर दुपारी १३:२५ वाजता पोहोचेल.
थांबा - हावड़ा ते अहमदाबाद अप दिशा कडे जाणारी गाडी क्र. ०२८३४ प्रत्येक शनिवारी भुसावळ मंडलच्या बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब स्थानकावर येईल व प्रत्येक रविवारी नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव स्थानकावर पोहोचेल.
१३ जुलैपासून गाडी क्र. ०२८३३ डाऊन अहमदाबाद -हावडा विशेष गाडी प्रत्येक सोमवारी अहमदाबाद स्थानकावरून ००:१५ वाजता प्रस्थान होईल. मंगळवारी हावडा स्थानकावर दुपारी १३:३० वाजता पोहोचेल.
थांबा- अहमदाबाद- हावडा डाऊन दिशाकडे जाणारी गाडी क्र. ०२८३३ प्रत्येक सोमवार भुसावळ मंडलच्या जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, जलंब, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा स्थानकावर पोहोचेल.
१५ जुलैपासून गाडी क्र. ०२८१० अप हावडा- मुंबई मेल विशेष गाडी प्रत्येक बुधवारी हावडा स्थानकावरून २०.०० वाजता प्रस्थान करेल. शुक्रवारी मुंबई स्थानकावर सकाळी ०५.२० वाजता पोहोचेल.
थांबा-हावडा ते मुंबई अप दिशाकडे जाणारी गाडी क्र. ०२८१० प्रत्येक गुरुवारी भुसावळ मंडलच्या बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जलगाव, चाळीसगाव, मनमाड स्थानकावर येईल आणि प्रत्येक शुक्रवारी नाशिक, देवळाली स्थानकावर पोहोचेल.
१७ जुलैपासून गाडी क्र. ०२८०९ डाऊन - हावडा मेल विशेष गाडी प्रत्येक शुक्रवारी मुंबई स्थानकावरून २०.३५ वाजता सुटेल व रविवारी सकाळी ०५.५० वाजता हावडा स्थानकावर पोहोचेल.
थांबा- मुंबई ते हावडा डाउन दिशेकडे जाणारी गाडी क्र. ०२८०९ प्रत्येक शनिवारी भुसावळ मंडलच्या देवळाली, नाशिक, मनमाड,चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, जलंब, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा नाशिक स्थानकावर पोहोचेल.