शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

Vidhan Sabha 2019 : मतदानाचा टक्का वाढविणे हेच आव्हान - जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 13:26 IST

ईव्हीएमबाबत समाधान होईपर्यंत प्रात्यक्षिक दाखविण्याची तयारी

सुशील देवकर जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. निवडणुकीसाठी प्रशासनाची काय तयारी झाली आहे? याबाबत जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे म्हणाले की, मतदान केंद्र निश्चित करण्याचे तसेच मतदार यादी अंतीम करण्याचे काम महत्वाचे असते. जिल्ह्यात ३५३२ मतदान केंद्र व ५४ साह्यकारी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.२० हजार मतदार वाढलेमतदार यादी निश्चित झाली आहे. जिल्ह्यात एकूण ३४ लाख ४७ हजार १४८ इतके मतदार आहेत. १५ जुलै पासून राबविण्यात आलेल्या विशेष मोहीमेत तब्बल २० हजार मतदार समाविष्ट झाले असल्याची माहिती डॉ.ढाकणे यांनी दिली.मतदार केंद्रांमधील सुविधांवर लक्षजिल्हाधिकारी म्हणाले की, मतदान केंद्रांसाठी ग्रामीण भागात जि.प. शाळा घेण्यात येतात. मात्र अनेक शाळांचे वीज कनेक्शनच थकबाकीमुळे कट करण्यात आलेले आहेत. त्यामुळे महावितरणला मतदानाच्या दोन दिवस आधीपर्यंत हे कट केलेले वीज कनेक्शन पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधीतांनाही वीज बिलाची थकबाकी भरण्याचे आदेश दिले आहेत.विश्वास बसेपर्यंत प्रात्यक्षिक दाखवूईव्हीएमबाबत अजूनही काही लोकांच्या मनात शंका असल्याची विचारणा केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, कुणाला अजूनही ईव्हीएमवरील मतदानाबाबत शंका असल्यास कुठल्याही तहसीलदार कार्यालयात अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात यावे. त्याच्या शंकांचे निरसन केले जाईल. अगदी संबंधीताचे समाधान होईपर्यंत बटन दाबून मतदानाची प्रक्रिया करून दाखविली जाईल. तसेच व्हीव्हीपॅटही असल्याने शंका घेण्याचे कारण नाही, असे सांगितले.ईव्हीएमच्या सुरक्षेची काळजीमतदान प्रक्रियेदरम्यान जिल्ह्यातील ३६० मतदान केंद्रांवर वेबकास्टींग करण्यात येणार आहे. तसेच ईव्हीएमची वाहतूक करणाºया वाहनांसह निवडणूक प्रक्रियेतील सर्वच वाहनांवर जीपीएस ट्रॅकर बसविण्यात येणार आहेत. तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकेही स्थापन करण्यात आले असून तीन नाक्यांवरही पथके तैनात करण्यात आले आहेत.कारवाईत कोणीही अपवाद नाहीआचारसंहितेचे काटेकोर पालन प्रत्येकाला करावेच लागेल. कोणी कितीही मोठा, कितीही पॉवरफुल असला तरीही कुणालाही क्षमा नाही. लगेच व निष्पक्षपणे कारवाई केली जाईल. २७ पासून उमेदवारी अर्ज दाखल करणे व त्यानंतर प्रचारास सुरूवात होईल. उमेदवारी अर्ज शासकीय छापखान्यातून प्राप्त होत आहेत. काही अर्ज प्राप्त झाले आहेत. सभांसाठी मैदानांची परवानगीही ‘प्रथम येणाºयास प्राधान्य’ या तत्वावर दिली जाणार असल्याचे डॉ.ढाकणे यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव