चाळीसगावला ८१ हजार नागरिकांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:18 IST2021-08-22T04:18:54+5:302021-08-22T04:18:54+5:30
चाळीसगाव : शहरासह तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाल्यानंतर शुक्रवारअखेर ८१ हजार ११४ नागरिकांनी लस घेतली असून, पाच हजार ...

चाळीसगावला ८१ हजार नागरिकांनी घेतली लस
चाळीसगाव : शहरासह तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाल्यानंतर शुक्रवारअखेर ८१ हजार ११४ नागरिकांनी लस घेतली असून, पाच हजार नागरिकांनी लसीकरणाचा दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन तालुका आरोग्य विभागाने केले आहे.
एक हजार लोकसंख्या असणाऱ्या गावांचे पूर्ण लसीकरण पुढील आठवड्यापासून केले जाणार आहे. दरम्यान, शनिवारी पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
चाळीसगाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव तसा उशिराच झाला. पहिला रुग्ण येथे टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्प्याच्या अखेरीस सापडला. तिसऱ्या टप्प्याच्या अखेरीस आढळलेल्या ११ बाधितांनी कोरोनावर माती करीत चाळीसगावच्या नावापुढे कोरोनामुक्त अशी अक्षरे झळकवली. मात्र, हा आनंद अल्पावधीत हिरावला गेला. यानंतर बाधितांची संख्या ९९४९ इतकी झाली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण धिम्या गतीने सुरू असून, लस उपलब्धतेनुसार लसीकरण सुरू आहे. लसीकरण सुरू होऊन सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. या काळात एकूण ८१ हजार ११४ नागरिकांनी लस घेतली असून, पाच हजार नागरिकांचा दुसरा डोस घेणे बाकी आहे. आरोग्य यंत्रणेतर्फे दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केले गेले आहे.
चौकट -
ग्रामीण भागात १० आरोग्य केंद्रांवर सुविधा
एकूण ३ लाख ५० हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. शुक्रवारअखेर या उद्दिष्टानुसार केवळ २३ टक्केच लसीकरण झाले आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवावा, अशी मागणी होत आहे. दहिवद, खेडगाव, लोंढे, पातोंडा, रांजणगाव, शिरसगाव, तळेगाव, तरवाडे, उंबरखेडे, वाघळी व मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
चौकट
कोरोना रिपोर्टकार्ड
एकूण बाधित-९९४९
बरे झालेले रुग्ण-९८२३
कोरोनाबळी -१२६
चौकट
शहरात २१ जार ६४७ नागरिकांचे लसीकरण
शहरात ट्रामा केअर सेंटर, न. पा. दवाखाना व खासगी रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुविधा आहे. या तिघाही ठिकाणी शुक्रवारअखेर २१ हजार ६४७ नागरिकांनी लस घेतली आहे.
१...ग्रामीण व शहरी भागातही लसीकरणासाठी केंद्रांवर सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा लागतात.
२...लसीकरण दोन ते चार दिवस सुरू असते. लसींचा पुरवठा संपल्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होते. त्यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे.
चौकट
कमी लोकसंख्येच्या गावांचे पूर्ण लसीकरण
ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी कमी लोकसंख्या असणाऱ्या गावांचे पूर्ण लसीकरण करण्याचे नियोजन तालुका आरोग्य विभागाने केले आहे. यासाठी किमान एक हजार लोकसंख्या असणाऱ्या गावांची निवड केली जाणार आहे.
इन्फो
पाच हजार नागरिकांनी अजूनही कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही, त्यांनी तो घ्यावा. यासाठी आम्ही यंत्रणा अर्लट केली आहे. दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांनी तातडीने पुढे यावे. एक हजार लोकसंख्या असणाऱ्या लहान गावांचे पूर्ण लसीकरण करण्याचे नियोजन केले असून, त्याची अंमलबजावणी पुढील आठवड्यापासून केली जाणार आहे.
- डॉ. देवराम लांडे, तालुका आरोग्य अधिकारी, चाळीसगाव.
चौकट
केंद्रनिहाय लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या
दहिवद-५४४५
खेडगाव- ५४२३
लोंढे-५६३२
पातोंडा-५३३५
रांजणगाव-५१३७
शिरसगाव-५७४२
तळेगाव-५४२३
तरवाडे-६०२८
उंबरखेडे-६२९२
वाघळी-६०१७
मेहुणबारे ग्रामीण-४५४३
रुग्णालयात
ट्रामा केअर सेंटर १०,९८९.
न. पा. दवाखाना- ३१६८
खासगी रुग्णालय-७५९०
एकूण - ८१, ११४