चाळीसगावजवळ बस झाडावर धडळली, १७ प्रवाशी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 13:16 IST2018-04-29T13:16:44+5:302018-04-29T13:16:44+5:30

चाळीसगावजवळ बस झाडावर धडळली, १७ प्रवाशी जखमी
आॅनलाइन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. २९ - औरंगाबादहून शिंदखेड्याकडे जाणा-या बसला रविवारी सकाळी पावणे सहा वाजता चाळीसगावजवळ अपघात झाला. बस झाडावर धडकल्याने १७ प्रवाशी किरकोळ जखमी झाले.
बस क्रमांक एमएच - ४०, एन. ९९०७ ही औरंगाबादहून शिंदखेड्याकडे जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११वर चाळीसगावनजीक ती एका झाडावर धडकली. झाडाची फांदी बसच्या आत घुसल्याने १७ प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. प्रवाशांवर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. बस चालकाविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास पोहेकॉ किशोर सोनवणे करीत आहे.