शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावच्या तरुणीचा पतंगाच्या मांजाने गळा चिरुन पुण्यात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 12:55 IST

दुर्देवी घटना

ठळक मुद्देउपचारापूर्वीच मृत्यूसोमवारी सकाळी चाळीसगाव येथे अंत्यसंस्कार

चाळीसगाव, जि. जळगाव : दुचाकीवरुन जात असताना पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने चाळीसगाव येथील डॉक्टर तरुणीचा पुण्यात दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी पुणे भोसरी मार्गावर नाशिक फाटा येथे घडली. मृत तरुणीवर सोमवारी सकाळी साडेदहा वाजता चाळीसगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.या बाबत अधिक माहिती अशी की, कल्याण निकम, पौर्णिमा निकम यांची कन्या डॉ. सोनाली निकम (वय २६, रा. पिंपळे सौदागर, मूळ राहणार चाळीसगाव, जि. जळगाव) या रविवारी सायंकाळी पुण्याहून भोसरीकडे आपल्या दुचाकीवरून येत होत्या. नाशिक फाटा येथील उड्डाणपुलावरून जात असताना त्यांच्या गळ्यात पतंगाचा मांजा अडकला. दुचाकीचा वेग जास्त असल्याने या मांजामुळे त्यांचा गळा कापला गेला. त्यांना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.डॉ. सोनाली या चाळीसगाव येथील असून डॉक्टर म्हणून पुण्यात आपली सेवा बजावत होत्या. सोनाली यांची आई पौर्णिमा या टाकळी प्र.चा.जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका तर वडील कल्याण निकम हे ग.स. बँकेतील निवृत्त कर्मचारी आहेत. सोनालीचे अपघाती निधन झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रात्री चाळीसगाव येथील त्यांच्या निवासस्थानी नातेवाईकांनी गर्दी केली होती. सोमवारी पहाटे सोनाली यांचा मृतदेह चाळीसगाव येथे आणण्यात आला. सकाळी साडे दहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव