चाळीसगावला जिल्हा दूध संघाचे शीतकरण केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 18:00 IST2019-01-24T18:00:01+5:302019-01-24T18:00:19+5:30
प्रक्रिया उद्योगही उभारणार

चाळीसगावला जिल्हा दूध संघाचे शीतकरण केंद्र सुरू
चाळीसगाव : हिरापूररोडवरील एका डेअरीत जिल्हा दूध संघातर्फे दूध शीतकरण केंद्र सुरु करण्यात आले असून गुरुवारी त्याचा शुभारंभ झाला. यावेळी संघाचे संचालक प्रमोद पाटील, डॉ. संजीव पाटील, सुनिता पाटील यांच्यासह तालुक्यातील दूध उत्पादक व पशुपालक उपस्थित होते.
दरदिवशी २० हजार लिटरचे संकलन
चाळीसगाव तालुक्यात दुधाची उपलब्धता वाढली आहे. दूध उत्पादक व पशुपालकांना माफक व योग्य भाव देऊन दूध खरेदी केले जाणार आहे. सुरु झालेल्या शीतकेंद्रात दरदिवशी २० हजार लीटर दुधाचे संकलन केले जाणार आहे. हिरापूररोडस्थित सुरु झालेले संकलन केंद्र हे तात्पुरत्या स्वरुपाचे असून एमआयडीसीत लवकरच मान्यवरांच्या उपस्थित प्रक्रिया उद्योग व शीतकरण युनिटचे उदघाटन केले जाणार असल्याचेही सांगितले.