चाळीसगाव महाविद्यालयाने केला ६०० झाडे जगविण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 12:21 IST2019-08-07T12:20:59+5:302019-08-07T12:21:31+5:30

ट्रीगार्डही बसविले

Chalisgaon College has resolved to provide 3 plants | चाळीसगाव महाविद्यालयाने केला ६०० झाडे जगविण्याचा संकल्प

चाळीसगाव महाविद्यालयाने केला ६०० झाडे जगविण्याचा संकल्प

चाळीसगाव, जि. जळगाव : चाळीसगाव महाविद्यालयाने लागवड केलेली ६०० झाडे जगविण्याचा संकल्प करुन ख-या अथार्ने ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हे सिद्ध केले आहे. ६०० झाडांना नुकतेच ट्रीगार्डही लावण्यात आले आहे. यावेळी संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियम परिसरात वृक्षरोपणाचा कार्यक्रम नूकताच झाला. ६०० वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्यासाठी सर्व झाडांना ट्रीगार्ड लावण्यात आले. लवकरच सर्व झाडांना पाणी देण्यासाठी ठिंबक सिंचन सुविधा देखील साकारण्यात येणार आहे.
महाविद्यालयाचे चेअरमन डॉ.एम.बी.पाटील, प्राचार्य डॉ मिलिंद बिल्दीकर, एन.सी.सी प्रमूख प्रा.राजेश चंदनशिव, क्रीडा शिक्षक प्रा.खुशाल देशमूख, कार्यालयीन प्रमुख हिलाल पवार व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षप्रेमाची प्रतिज्ञा सामुहिकपणे म्हटली.

Web Title: Chalisgaon College has resolved to provide 3 plants

टॅग्स :Jalgaonजळगाव