मध्य रेल्वेची ७० हजार ३७४ वॅगन माल वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 14:41 IST2020-04-25T14:40:35+5:302020-04-25T14:41:19+5:30
मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागातून दररोज लोडिंग-अनलोडिंगसाठी विविध टर्मिनल्सवर सुमारे ७५ रॅक (मालगाड्या) हाताळल्या जात आहेत.

मध्य रेल्वेची ७० हजार ३७४ वॅगन माल वाहतूक
भुसावळ, जि.जळगाव : मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागातून दररोज लोडिंग-अनलोडिंगसाठी विविध टर्मिनल्सवर सुमारे ७५ रॅक (मालगाड्या) हाताळल्या जात आहेत. ज्यात अन्नधान्य, वीज निर्मितीसाठी कोळसा आणि सिमेंटसारख्या इतर वस्तूंचा समावेश आहे.
२४ तास या तत्त्वावर सतत कार्यरत असलेल्या गुड्स शेड, स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांमधील रेल्वे कर्मचाऱ्यांनी २३ मार्च ते २२ एप्रिलपर्यंत १ हजार ४१५ रॅकमध्ये आवश्यक वस्तूंच्या ७० हजार ३७४ वॅगन लोड करणे शक्य केले आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागात २५२ वॅगन धान्य, ४८४ वॅगन साखर, ३४ हजार ४९७ वॅगन कोळसा, २५ हजार ३८० वॅगन्स कंटेनर, ५ हजार १८३ वॅगन्स पेट्रोलियम उत्पादने, १ हजार ८०२ वॅगन खते, ६३५ वॅगन्स स्टील, २५२ वॅगन्स डी-आॅईल केक, ११७ वॅगन सिमेंट व १ हजार ७७२ वॅगन विविध वस्तू भरल्या गेल्या.
याचबरोबर सुमारे २२० पार्सल गाड्या वेळापत्रकानुसार चालविल्या जात असून, त्यामध्ये औषधे, भाज्या, नाशवंत वस्तू, पोस्टल बॅग आदी आवश्यक वस्तूंची देशभरात वाहतूक केली जात आहे. मध्य रेल्वेने २१ एप्रिलपर्यंत २ हजार टनपेक्षा जास्त जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली. ज्यात औषधे, वैद्यकीय उपकरणे, फळे, भाज्या, अंडी, ज्यूट बियाणे, टपाल पिशव्या आणि कच्चा माल समाविष्ट आहे, असे भुसावळ रेल्वे विभागाने कळविले आहे.