दिव्यांग दिनानिमित्त ४० दिव्यांगांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 21:41 IST2019-12-03T21:40:51+5:302019-12-03T21:41:19+5:30
जळगाव - राष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त मंगळवारी शहरातील अल्पबचत भवन येथे सामाजिक क्षेत्रातील दिव्यांग बांधवांना व उत्कृष्ठ कलावंतांना राष्ट्रीय दिव्यांग ...

दिव्यांग दिनानिमित्त ४० दिव्यांगांचा सत्कार
जळगाव- राष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त मंगळवारी शहरातील अल्पबचत भवन येथे सामाजिक क्षेत्रातील दिव्यांग बांधवांना व उत्कृष्ठ कलावंतांना राष्ट्रीय दिव्यांग सेना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात ४० दिव्यांगांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार सुरेश भोळे, दिव्यांग सेनेचे अध्यक्ष प्रसाद साळवी व सोमनाथ माळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते दिव्यांगांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. शहरात प्रथमच दिव्यांगांसाठी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन, जिल्हा उपाध्यक्ष शेख शकील, ज्ञानेश्वर पाटील, हितेश तायडे, भीमराव म्हस्के, प्रदीप चव्हाण, आदिल शहा उपस्थित होते.