शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

अमळनेरात पर्यावरण संवर्धनाचा जल्लोष, अंबर्षी टेकडीला आले यात्रेचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 12:42 AM

ओमच्या गजरात मिनिटात लावली ११११ झाडे

अमळनेर, जि.जळगाव : तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या संकल्पनेतून महसूल विभाग व अंबर्शी टेकडी गृपतर्फे ८ रोजी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी अवघ्या एका मिनिटात एक हजार १११ झाडे लावण्यात आली. पर्यावरण संवर्धनासाठी विविध घटक एकत्र आल्याने अंबर्षी टेकडीला एखाद्या यात्रेचे स्वरूप आले होते.शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत एकत्र भरपूर झाडे लावण्यासाठी तहसीलदार प्रदीप पाटील यांनी अंबर्षी टेकडी गृपच्या सहकार्याने एका मिनिटात ११११ झाडे लावण्याची संकल्पना मांडली. त्यासाठी अमळनेर पालिका, सामाजिक वनीकरण, प्रादेशिक वनविभाग, मंगळग्रह संस्था, सानेगुरुजी शाळा, डी.आर.कन्याशाळा, आर्मी स्कूल, एनसीसी, एनएसएस, मारवड विकास मंच, माझं गाव माझं अमळनेर, पोलीस पाटील संघटना, जवखेडा विकास मंच, तलाठी संघटना, महिला मंच, खाशि मंडळ, अर्बन बँक, पाडळसरे संघर्ष समिती, लोकमान्य विद्यालय, ताडेपुरा आश्रमशाळा, सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र, गायत्री परिवार, ओमशांती परिवार, आयएमए, भूमी अभिलेख, लायन्स क्लब, रोटरी क्लब, अमळनेर विकास प्रतिष्ठान यांनी एकाच वेळी झाडे लावली ‘ओम’च्या मंत्रोच्चारात एका मिनिटात एकाच वेळी झाडे लावलीत.आर्थिक सहकार्यमाजी आमदार साहेबराव पाटील व नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी ११ हजार १११ रुपये, जवखेडा सरपंच सुभाष पाटील यांनी एक हजार १११, नगावचे माजी सरपंच बापू कोळी यांनी एक हजार रुपये मदत केली, तर जवखेडा विकास मंच व विशाल शर्मा यांनी उपस्थित विद्यार्थी व संघटना यांनी उपहाराचा खर्च दिला.या वेळी आयकर अपर उपायुक्त संदीप साळुंखे, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील, माजी प्राचार्य डॉ.ए.जी.सराफ, डॉ.एस.आर.चौधरी, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक गिरीश पाटील, डॉ.अनिल शिंदे, सामाजिक वनीकरणचे संतोष बोरसे व शहरातील सर्व स्तरातील संघटना व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.समाजातील सर्वच घटक एकत्र आल्याने आज अंबर्षी टेकडीला एखाद्या यात्रेचे स्वरूप आले होते. झाडे लावल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.

टॅग्स :Green Planetग्रीन प्लॅनेटAmalnerअमळनेर