चौधरीवाड्यातील संग्रहालयात बहिणाईंचा ६९ वा स्मृतीदिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:44 IST2020-12-04T04:44:49+5:302020-12-04T04:44:49+5:30
ट्रस्टचे विश्वस्त दिनानाथ चौधरी यांच्याहस्ते बहिणाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी बहिणाबाई चौधरी यांच्या नातसून पद्माबाई चौधरी, पणती ...

चौधरीवाड्यातील संग्रहालयात बहिणाईंचा ६९ वा स्मृतीदिन साजरा
ट्रस्टचे विश्वस्त दिनानाथ चौधरी यांच्याहस्ते बहिणाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी बहिणाबाई चौधरी यांच्या नातसून पद्माबाई चौधरी, पणती प्रियंका चौधरी, शोभाबाई चौधरी, प्रिया चौधरी, वैशाली चौधरी, हितेंद्र चौधरी, मनस्वी चौधरी, राजेंद्र हरिमकर उपस्थित होते. परिवर्तन जळगावच्या महाराष्ट्राभर गाजत असलेल्या बहिणाईंची गीते आणि कवितांची सुरेल मैफल, ''''अरे संसार संसार''''च्या माध्यमातून चौधरीवाड्यातील सदस्यांनी अनुभवली. यशस्वीतेसाठी अशोक चौधरी, रंजना चौधरी यांनी सहकार्य केले. दिवसभर स्मृतीसंग्रहालयाला साहित्यप्रेमींनी भेटीसुद्धा दिल्यात.
बहिणाई स्मृती संग्रहालयाची वैशिष्ट्ये
जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या संकल्पनेतून भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचे रूपांतर संग्रहालयात झालेले आहे. बहिणाबाई चौधरी यांच्या रोजच्या वापरातील शेतीची अवजारं, स्वयंपाकाच्या वस्तू, भांडी, पुजेचं साहित्य ह्यांची जपणूक केली आहे. हा अलौकिक ठेवा पुढील पिढीला पाहता येत आहे. ''''अरे संसार संसार'''' म्हणत संसारातील सुख दुःखांच्या साक्षीदार असलेल्या अनेक गोष्टी या संग्रहालयात बघायला मिळतात.
फोटो कॅप्शन : चौधरी वाड्यातील बहिणाई स्मृती संग्रहालय येथे बहिणाईंच्या स्मृतींना वंदन करताना विश्वस्त दिनानाथ चौधरी, शोभाबाई चौधरी, वैशाली चौधरी, प्रिया चौधरी, पद्माबाई चौधरी, प्रियंका चौधरी, अशोक चौधरी, रंजना चौधरी, हितेंद्र चौधरी, मनस्वी चौधरी आदी