शेंदुर्णी येथे सद्गुरूहरिप्रसाद महाराज यांची पुण्यतिथी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 16:26 IST2019-08-07T16:24:56+5:302019-08-07T16:26:14+5:30

आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे बुधवारी सद्गुरूहरिप्रसाद महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

Celebrating the death anniversary of Sadguru Hari Prasad Maharaj at Shendurani | शेंदुर्णी येथे सद्गुरूहरिप्रसाद महाराज यांची पुण्यतिथी साजरी

शेंदुर्णी येथे सद्गुरूहरिप्रसाद महाराज यांची पुण्यतिथी साजरी

ठळक मुद्देगरुड विद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढली दिंडीदिंडीमध्ये बँड पथक बॅनर लेझीम पथक, हरित सेना पथक, एनसीसी पथक, भजनी मंडळ सहभागी

शेंदुर्णी, ता.जामनेर, जि.जळगाव : आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे बुधवारी सद्गुरूहरिप्रसाद महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
प.पू. हरिप्रसाद महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांच्या दिंडीला सुरुवात झाली. यावेळी संस्थेचे चेअरमन संजय गरुड, जि.प.सदस्या सरोजिनी गरुड व पंडितराव गरुड यांनी हरिप्रसाद महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी गावातून भव्य दिंडी काढण्यात आली.
यावेळी दिंडीमध्ये बँड पथक बॅनर लेझीम पथक, हरित सेना पथक, एनसीसी पथक, भजनी मंडळ हरी नामाचा जयघोष करत चौकाचौकात प्रात्यक्षिक करत सामाजिक संदेश देत त्रिविक्रम मंदिरामार्गे विजदेवळीवर गेले. तेथे संजय गरुड यांच्या हस्ते सद्गुरू हरिप्रसाद महाराज यांच्या मंदिरात पूजा करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांना सद्गुरू हरिप्रसाद महाराज यांच्या कार्याची माहिती े उपमुख्याध्यापक एस.एस. जैन यांनी दिली.
याप्रसंगीे मुख्याध्यापक डी.आर.शिंपी, पर्यवेक्षक डी.बी.सूर्यवंशी, आर.एस. परदेशी, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. पुण्यतिथीनिमित्त सायंकाळी कीर्तन व संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले. समारोपप्रसंगी माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Web Title: Celebrating the death anniversary of Sadguru Hari Prasad Maharaj at Shendurani