शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:21 IST2021-09-07T04:21:08+5:302021-09-07T04:21:08+5:30
नूतन मराठा विद्यालय नुतन मराठा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे शिक्षक सी.आर. महाजन यांच्याहस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण ...

शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन साजरा
नूतन मराठा विद्यालय
नुतन मराठा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे शिक्षक सी.आर. महाजन यांच्याहस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश मोरे, महिला कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका एन. आर. कुसंबे यासह विद्यार्थी उपस्थित होते.
साहित्य विकास मंडळ
साहित्य विकास मंडळातर्फे कवी संमेलन घेण्यात आले. यावेळी अरुण जोशी, शीतल पाटील, शिवलाल बारी, सुखदेव वाघ, गोविंद देवरे आदींनी कविता सादर केल्या. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रकाश महाजन, मंडळाचे संस्थापक गोविंद देवरे उपस्थित होते. सूत्रसंचालन गोविंद पाटील यांनी तर आभार उमाकांत वाणी यांनी मानले.
श्रीराम विद्यालय
मेहरूण येथील श्रीराम माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर,डॉ.सतीश पाटील, जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे, दिलीप सोनवणे, विकास पवार, जिल्हा उपाध्यक्षा वंदना चौधरी, अश्विनी देशमुख, पन्नालाल वंजारी, अशोक लाडवंजारी, बालाजी सानप उपस्थित होते.
भगीरथ इंग्लिश स्कूल
भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये येथे मुख्याध्यापिका सीमा वैजापूरकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षिका प्रिया सफळे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्याम ठाकरे, ज्येष्ठ शिक्षक एस.डी. भिरुड यांच्यासह इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.