मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प करून केला वाढदिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 20:58 IST2018-07-15T20:57:38+5:302018-07-15T20:58:18+5:30
प्राचार्य युवकाचे नवे ‘औक्षण’

मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प करून केला वाढदिवस साजरा
चाळीसगाव, जि.जळगाव : वाढदिवसाच्या बडेजावला फाटा देताना परंपराही टाळून भूषण भीमराव खलाणे या युवकाने मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प करुन एक वेगळेच औक्षण रुढ केले आहे. हरिओम आयटीआयमध्ये भूषण खलाणे हे प्राचार्य आहेत.
सद्य:स्थितीत वाढदिवस वाजतगाजत साजरा करण्याचे फॅड रुजले आहे. तरुणाईमध्ये तर याची विशेष क्रेझ आहे. मात्र याला छेद देत आपण समाजाचे देणेकरी आहोत, अशी समर्पणाची भावना ठेऊन भूषण खलाणे यांनी शनिवारी वसुंधरा फाऊंडेशनकडे अवयव दानाचा फॉर्म भरुन दिला.
याप्रसंगी वसुंधरा फाउंडेशनचे सचिन पवार, अजय जोशी, धर्मराज खैरनार, सुनील भामरे, देवेन पाटील, आशिष खलाणे, करण राजपूत, प्र्रवीण जाधव, प्रतीक पाटील, निखिल सोनजे, चेतन वाघ, शुभम पवार, सलमान शेख, अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.