भुसावळ येथे गावठी कट्टा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:26 IST2019-03-12T23:26:31+5:302019-03-12T23:26:44+5:30

गौरव राजू वाघ याला अटक

The cattle seized at Bhusawal | भुसावळ येथे गावठी कट्टा जप्त

भुसावळ येथे गावठी कट्टा जप्त

भुसावळ - परवाना नसताना बेकायदेशीररित्या गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या गौरव राजू वाघ (२७, रा. शिवाजी नगर, भुसावळ) याला अटक करण्यात येऊन त्याच्याजवळील गावठी बनावटीचा कट्टा भुसावळ शहर पोलिसांनी जप्त केला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव वाघ हा शस्त्राचा कोणताही परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी तो गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पंचायत समिती परिसरातून गौरव वाघ यास भुसावळ शहर पोलिसांनी अटक करून त्याच्याजवळील गावठी कट्टा जप्त केला.
या प्रकरणी पोलीस नाईक सुनील सैंदाणे यांच्या फिर्यादीवरून गौरव वाघ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The cattle seized at Bhusawal

टॅग्स :Jalgaonजळगाव