दुचाकी चोरी प्रकरणी अमरावती येथून तीन दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 18:20 IST2018-12-07T18:19:24+5:302018-12-07T18:20:10+5:30

बोदवड , जि.जळगाव : बोदवड येथील दुचाकी चोरी प्रकरणी तीन दुचाकी अमरावती येथून हस्तगत करण्यात आल्या आहेत. बोदवड तालुक्यातील ...

In the case of two-wheeler theft, three-wheeler can be obtained from Amravati | दुचाकी चोरी प्रकरणी अमरावती येथून तीन दुचाकी हस्तगत

दुचाकी चोरी प्रकरणी अमरावती येथून तीन दुचाकी हस्तगत

ठळक मुद्देसारोळा येथील आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर मिळाली माहितीअमरावती येथे तीन सायकली विकल्याचे केले कबूल

बोदवड, जि.जळगाव : बोदवड येथील दुचाकी चोरी प्रकरणी तीन दुचाकी अमरावती येथून हस्तगत करण्यात आल्या आहेत.
बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथून २३ नोव्हेंबर रोजी दुचाकी चोरीस गेली होती. याप्रकरणी बोदवड पोलिसात कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा येथून सागर उर्फ करण श्यामराव चव्हाण याला ताब्यात घेत दुचाकी हस्तगत केली होती. या आरोपीने आणखी तीन दुचाकी अमरावती जिल्ह्यात विकल्याचे सांगितले होते. याप्रकरणी बोदवड पोलिसांचे पथक तपासी अंमलदार गजानन काळे, सचिन चौधरी, उद्द्ल चव्हाण हे पथक अमरावती येथे गेले होते. त्यात अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथून श्याम उत्तमराव इंदोरे रा.जउलखेड, ता.अकोट, जि.अकोला याला ताब्यात घेतले व त्याने विकलेल्या तीन दुचाकीही जप्त करीत बोदवडला आणल्या आहे. सदर दुचाकी वरणगाव, मुक्ताईनगर, मुक्ताळ, येथील आहे, तर सदर आरोपीला भुसावळ न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी मिळाली असून, मुक्ताईनगर पोलिसांनी पुढील तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

Web Title: In the case of two-wheeler theft, three-wheeler can be obtained from Amravati