शिक्षक मारहाण प्रकरणात केवळ अदखलपात्र नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 21:49 IST2019-02-16T21:48:55+5:302019-02-16T21:49:11+5:30
रक्तबंबाळ अवस्थेतील फोटो सर्वत्र व्हायरल

शिक्षक मारहाण प्रकरणात केवळ अदखलपात्र नोंद
जळगाव : आर.आर.विद्यालयाचे शिक्षक गिरीश रमणलाल भावसार (वय ४५ रा. निवृत्तीनगर) यांना टवाळखोरांनी मारहाण केल्याच्या प्रकरणात तीन दिवसांनी अर्थात शनिवारी जिल्हा पेठ पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. भावसार यांना फायटरने मारहाण होऊन नाकाचे हाड फ्रॅक्चर झालेले आहे. रक्तबंबाळ अवस्थेतील फोटो सर्वत्र व्हायरल झालेले आहे. असे असताना गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलिसांनी केवळ अदखपात्रची नोंद घेतली. गेल्या महिन्यात देखील आर.आर.विद्यालयाच्या प्रवेशाव्दारजवळ किर्तीकुमार शेलकर नामक शिक्षकाला टवाळखोरांनी मारहाण केली होती. तेव्हा देखील पोलिसात कोणतीच नोंद झालेली नव्हती. टवाळखोर खुलेआमपणे शहरात धुडगूस घालत असतानाही पोलीस गुन्हा दाखल करणे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भावसार यांना गुरुवारी दुपारी १२ वाजता विसनजी नगरात मारहाण झाली होती. त्यात त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. दरम्यान, याप्रकरणामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.