भरधाव ट्रॅक्टरने दोन विद्यार्थ्यांना उडविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 12:00 IST2019-02-21T11:58:21+5:302019-02-21T12:00:22+5:30
भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरने रिक्षाला दिलेल्या धडकेत दोन शाळकरी मुलांना चिरडल्याची घटना आज पहाटे 6:45 वाजता यावल तालुक्यातील आडगाव येथे घडली.

भरधाव ट्रॅक्टरने दोन विद्यार्थ्यांना उडविले
जळगाव- भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरने रिक्षाला दिलेल्या धडकेत दोन शाळकरी मुलांना चिरडल्याची घटना आज पहाटे 6:45 वाजता यावल तालुक्यातील आडगाव येथे घडली. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने ट्रॅक्टर पेटवून दिले तसेच एका पोलिसाला मारहाण करण्यात आल्याचेही वृत्त आहे.
मयत दोन्ही विद्यार्थी इयत्ता नववीचे असून सकाळी शाळेत जात होते. या घटनेत दोन्ही मुलांचा चेंदामेंदा झाला असून, रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. यावेळी परिसरातील नागरिक धाऊन आले व संतप्त झालेल्यांनी ट्रॅक्टर कडून तसेच इथे आलेल्या पोलिसाला देखील मारहाण केल्याचे वृत्त आहे.