जळगाव ग्रामीणमध्ये काेरोनाचा विस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:16 IST2021-04-07T04:16:17+5:302021-04-07T04:16:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढला असून सोमवारी ग्रामीण भागात १०२ नव्या कोरोनाबाधितांची ...

जळगाव ग्रामीणमध्ये काेरोनाचा विस्फोट
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढला असून सोमवारी ग्रामीण भागात १०२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे शहरात कोरोनाने पुन्हा एका दिवसात ३०० चा आकडा ओलांडला असून ३२३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. मृत्यू थांबत नसून सोमवारी ५ बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात आटोक्यात वाटत असताना गेल्या काही दिवसांपासून या भागातही संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ३६२ वर पोहोचली आहे, तर मृतांची संख्या ९३ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक उपचार घेणारे रुग्ण हे जळगाव तालुक्यातच असून त्याखालोखाल चोपडा येथे रुग्णांवर उपचार सुरू आहे.
मृत्यू वाढले
मृतांमध्ये जळगाव शहरातील ५५, ७८, ८३ वर्षांचे पुरुष तसेच ५७ व ६० वर्षीय महिला यांचा समावेश आहे. यासह यावल तालुक्यातील २, एरंडोल तालुक्यातील २, जळगाव ग्रामीणमधील १, भुसावळ, पाचोरा, भडगाव, रावेर मुक्ताईनगर येथील प्रत्येकी १ बाधिताच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उपचार सुरू असलेले रुग्ण ११६५६
लक्षणे नसलेले रुग्ण : ९०१८
लक्षणे असलेले रुग्ण २६३८
ऑक्सिजन पुरवठा करावा लागणारे रुग्ण : १२६७
अतिदक्षता विभागातील रुग्ण : ५६५