कार-टँकरच्या अपघातात, पारोळ्याचे दोन जण ठार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 10:49 AM2022-12-26T10:49:43+5:302022-12-26T10:50:32+5:30

नगरपालिका अभियंत्यासह डाॕक्टरचा समावेश. 

Car tanker accident two people killed parola jalgaon | कार-टँकरच्या अपघातात, पारोळ्याचे दोन जण ठार 

कार-टँकरच्या अपघातात, पारोळ्याचे दोन जण ठार 

googlenewsNext

राकेश शिंदे
पारोळा  जि.जळगाव : कॅप्सूल टँकर व कार यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पारोळ्यानजीक विचखेडा गावाजवळ सोमवारी सकाळी ७ वाजता घडली. मृतांमध्ये पारोळा नगरपालिकेचे अभियंता कुणाल सौपुरे (३५, रा. गोंधळ वाडा, पारोळा ) आणि डॉ. निलेश मंगळे (३५ रा. डी. डी. नगर, पारोळा) यांचा समावेश आहे. 

या अपघातात संदीप पवार  ३७, रा.आर. एल. नगर, पारोळा) हे जखमी झाले आहेत. शनिवार, रविवार सुट्टी असल्याने तिघे मित्र मुंबई येथे गेले होते. परतीचा प्रवास करत असताना पारोळ्यापासून काही अंतरावर असतानाच काळाने घाला घातला आणि कॅप्सूल टॅकर आणि कारच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Car tanker accident two people killed parola jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.