कारची पादचाऱ्याला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:16 IST2021-04-07T04:16:22+5:302021-04-07T04:16:22+5:30

जळगाव : रस्त्याने पायी जाणाऱ्या मजुराला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक देऊन जखमी केल्याची घटना शहरातील ...

The car hits the pedestrian | कारची पादचाऱ्याला धडक

कारची पादचाऱ्याला धडक

जळगाव : रस्त्याने पायी जाणाऱ्या मजुराला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक देऊन जखमी केल्याची घटना शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकात ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात कारचालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहरूण येथील संतोषीमाता नगरातील रहिवासी आसीफ शेख अब्दुल रहेमान हे सेंट्रिंगचे काम करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कामावरून मेहरूण येथे पायी जात असताना पुष्पलता बेंडाळे चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी (एमएच १९ सीझेड ७०७०) ने आसीफ शेख यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. यात त्यांच्या कमरेला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात चारचाकी वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. प्रशांत देशमुख करीत आहेत.

Web Title: The car hits the pedestrian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.