मकर संक्रांत- एक पाऊल निसर्गाच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 17:51 IST2020-01-24T17:50:16+5:302020-01-24T17:51:30+5:30

मकर संक्रांत हा नव्या वर्षातला पहिला सण. विशेष करून महिलांच्या ऊत्साहाचा हा सण, तिळगूळ देण्याचा, म्सखींना घरी बोलावून वाण देण्याचा हा सण. यंदा उच्च शिक्षित नवतरुणींनी मात्र हा सण साजरा करताना पर्यावरणाला महत्त्व देऊन यंदा झाडाच्या रोपांचे वाण देऊन एक पाऊल निसर्गाच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Capricorn - One step towards nature | मकर संक्रांत- एक पाऊल निसर्गाच्या दिशेने

मकर संक्रांत- एक पाऊल निसर्गाच्या दिशेने

ठळक मुद्देमहानगरात झाडाचे रोप वाण म्हणून देऊन नव्या पिढीने पर्यावरणाला दिले महत्वग्रामीण भागातील उच्च शिक्षित तरुणीने सासरी नवी मुंबईतील पनवेल (कामोठा) येथे केला प्रयोग

प्रमोद पाटील
कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : मकर संक्रांत हा नव्या वर्षातला पहिला सण. विशेष करून महिलांच्या ऊत्साहाचा हा सण, तिळगूळ देण्याचा, म्सखींना घरी बोलावून वाण देण्याचा हा सण. यंदा उच्च शिक्षित नवतरुणींनी मात्र हा सण साजरा करताना पर्यावरणाला महत्त्व देऊन यंदा झाडाच्या रोपांचे वाण देऊन एक पाऊल निसर्गाच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
कासोदा (बांभोरी) येथील माहेरवाशीण विशाखा शिंदे या उच्च शिक्षित तरुणीने सासरी नवी मुंबईतील पनवेल (कामोठा) येथे यंदा मकर संक्रांतीनिमित्ताने इमारतीमधील सर्व मैत्रिणींना हळदीकुंकवासाठी परंपरेप्रमाणे बोलावले, पण भेट वस्तू देताना नेहमीच्या भेटवस्तू न देता, झाडाची रोपं देण्याचा कार्यक्रम घडवून आणून सखींना आश्चयार्चा धक्का दिला. परंतु मैत्रिणी पण उच्चशिक्षित असल्याने त्यांनी या अनोख्या उपक्रमाचे मनापासून कौतुक करून ही झाडे जगवण्याची हमीदेखील दिली आहे.
यंदा संक्रांतीचा सण १५जानेवारीला होता. वाण देण्याचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत म्हणजे १ फेब्रुवारीपर्यंत सुरू रहाणार आहे. तिळगुळासह वाण लावण्याची पध्दत आपल्या महाराष्ट्रात आहे. त्यात सुगडाच्या वाणासोबत हळदकुंकू अत्तर, गुलाब पाणी, तिळगुळासह उसाचे तुकडे, हिरवे हरभरे, बोरं, गहू, गाजर, भुईमुगाच्या शेंगा इत्यादी देण्याची परंपरा आहे. परंतु धार्मिक महत्वासह आपल्या वसुंधरेची काळजीदेखील यानिमित्ताने नव्या पिढीला आहे, याची या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाने महिलावर्गात चर्चा होत आहे. कासोदा येथे माहेरीदेखील या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

गेल्या पावसाळ्यात आम्ही खांडेश्वर स्टेशनजवळील मैदानात निंबाची रोप लावली आहेत. दररोज आॅफिसला जाताना न चुकता या रोपांना पाणी देतो. नंतर पुढे जातो. ही रोप आता चार फुटांपेक्षा मोठी झाली आहेत. ती झाडे जगली आहेत. याने आत्मविश्वास वाढला व हा उपक्रम करण्याची प्रेरणा मिळाली.
-जितेंद्र शिंदे, विशाखाचे पती, कामोठा

 

Web Title: Capricorn - One step towards nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.