शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
6
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
7
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
8
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
9
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
11
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
12
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
13
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
14
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
15
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
16
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

उमेदवारास ऑनलाइन अर्ज भरावा लागणार

By admin | Published: January 17, 2017 1:01 AM

रुबल अग्रवाल : जिल्हा परिषदेसाठी 2457 मतदान केंद्रे

जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत  समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. मूळ अर्जाबरोबर ऑनलाइन अर्जाची प्रतही सादर करणेही आवश्यक असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. जिल्ह्यात जि.प. निवडणुकांसाठी  16 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. 27 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली असून प्रांत, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना प्रत्येक मतदारसंघात जाऊन तेथील पोस्टर्स, बॅनर्ससारख्या जाहिरातींद्वारे प्रचार होत असल्याचे लक्षात आल्यास कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 2457  मतदान केंद्रेजिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 67 गट आहेत. या गटांसाठी मतदारांची संख्या 21 लाख 61 हजार 374 एवढी आहे. तर मतदान केंद्रांची संख्या 2457 एवढी आहे. तालुकानिहाय मतदान केंद्र पुढीलप्रमाणे आहेत. चोपडा- 234, यावल- 160, रावेर- 203, मुक्ताईनगर 134, बोदवड- 59, भुसावळ- 114, जळगाव- 178, धरणगाव- 123, अमळनेर- 191, पारोळा- 131, एरंडोल- 99, जामनेर- 273, पाचोरा- 185, भडगाव- 117, चाळीसगाव- 256 याप्रमाणे मतदान केंद्र असतील. प्रत्येक मतदारसंघातील उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरणेही आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाकडून राजकीय पक्षांच्या काही व्यक्तींना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. तसेच सायबर कॅफेचालकांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही सुविधा 24 तास सुरू असेल. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी अडीच वाजेर्पयत ऑनलाइन अर्ज भरता येतील. प्रत्येक उमेदवाराने ऑनलाइन अर्ज भरल्याची प्रतही उमेदवारी दाखल करताना सादर करावी, अशा आयोगाच्या सूचना असल्याचेही जिल्हाधिका:यांनी सांगितले.तक्रारीसाठी नवीन अॅप4आचारसंहिता भंग होत असल्याबद्दलच्या तक्रारींसाठी राज्य निवडणूक आयोग नवीन मोबाइल अॅप  तयार करत असून, लवकरच त्याचा नंबरही जाहीर केला जाणार आहे. कोणताही नागरिक मोबाइलवर फोटो काढून तो या अॅपवर टाकू शकेल. याची तत्काळ दखल घेतली जाणार आहे.राजकीय पक्षांची वर्गाकडे पाठ4ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची माहिती देण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या पदाधिका:यांची बैठक व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ऑनलाइन अर्ज कसा भरावा याची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल या देणार होत्या. मात्र बैठकीच्या वेळात वा नंतरही राजकीय पक्षांचे पदाधिकारी या बैठकीस आलेच नाहीत.