सर्वोदयचा प्रचार सुरु असताना उमेदवाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 16:52 IST2021-03-18T16:50:58+5:302021-03-18T16:52:13+5:30
परिवर्तन पॕनल मधील उमेदवार सुपडू मांगो महाजन (७२) यांचे बुधवारी मध्यरात्री मालेगाव येथे उपचारादरम्यान निधन झाले.

सर्वोदयचा प्रचार सुरु असताना उमेदवाराचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : सर्वोदय शिक्षण संस्थेच्या निवडणुकीतील परिवर्तन पॕनल मधील उमेदवार सुपडू मांगो महाजन (७२) यांचे बुधवारी मध्यरात्री मालेगाव येथे उपचारादरम्यान निधन झाले.
महाजन हे कोरोना संसर्गाने बाधित झाले होते. दरम्यान निवडणुकीतील उमेदवाराचा मृत्यू झाल्याचा अहवाल गुरुवारी सहाय्यक निबंधक कार्यालयामार्फत पुणे येथील सहकार विभागाच्या प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. यामुळे निवडणूक स्थगित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवृत्त मुख्याध्यापक असलेले महाजन हे मूळ सायगावचे रहिवासी मात्र सद्यस्थितीत चाळीसगाव शहरात वास्तव्यास होते. त्यांची प्रकृती बरी नसल्याने चाळीसगाव येथे उपचारासाठी दाखल केले गेले. बुधवारी त्यांची प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे घेऊन जात असताना मालेगाव जवळ त्यांना अवस्थ वाटू लागले. मालेगाव येथेच बुधवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.