शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

कामातील अनियमिततेमुळे लेखा व्यवस्थापकांची नियुक्ती रद्द - जिल्हा आरोग्य अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:29 IST

महत्त्वाचे विषय प्रलंबित ठेवण्याचा ठपका

जळगाव : जिल्हा परिषदेतील राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागातील लेखा व्यवस्थापक नीलेश पाटील यांच्या कामात अनियमितता असल्याने त्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली. दरम्यान, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीदेखील आरोग्य विभागाचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या संचालकांना पत्र देऊन नीलेश पाटील यांना जळगाव जिल्ह्यामध्ये पुनर्नियुक्ती देऊ नये, असे कळविले आहे. त्यात महत्त्वाचे विषय प्रलंबित ठेवत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.नीलेश पाटील यांची २४ एप्रिल रोजी डॉ. कमलापूरकर यांनी नियुक्ती रद्द केली असून १२ वर्षातील पाटील यांच्या कारभाराविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, निवृत्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जे.एन. खडसे उपस्थित होते.निधीचे उशिरा वितरणजिल्ह्यासाठी जवळपास ४० ते ४५ कोटींचा निधी येतो. त्यात करण्यात येणाºया कामांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतर तो निधी दुसºया दिवशी वितरीत होणे गरेजेचे असते. मात्र तरीदेखील नीलेश पाटील हे वेळेत निधी वितरीत करीत नाही. इतकेच नव्हे तर ३० मार्च रोजी निधी वितरीत केले जात असे. मात्र एका दिवसात आर्थिक वर्ष अखेर ३१ मार्चपर्यंत निधी खर्च करणे शक्य होत नाही. परिणामी निधी परत जात असे, अशी माहिती डॉ. कमलापूरकर यांनी दिली. याचा परिणाम म्हणून अनेक विभाग प्रमुख स्वत: मंजुरीसाठी फाईल घेऊन जात असत, असेही त्या म्हणाल्या.गेल्या १२ वर्षांपासून असे प्रकार सुरू असून २०१३-१४मध्येदेखील ५५ हजार रुपयांच्या बिलाला जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी मंजुरी दिली, मात्र पाटील यांनी ती फाईल रोखून ठेवली होती, असा आरोप डॉ. जे.एन. खडसे यांनी केला.चौकशी अहवाल रोखून ठेवला२००९-१०मध्ये पाटील यांनी जि.प.मध्ये स्वत:ची वाहने वापरली. या बाबत तक्रारी झाल्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली, मात्र त्याचा अहवाल रोखून ठेवण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली.निधी १०० टक्के खर्च झालाच नाहीपाटील यांच्या विषय प्रलंबित ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे या १०० टक्के निधी खर्चच होऊ शकला नाही, असाही आरोप यावेळी करण्यात आला.औषधी पुरवठा थांबलावेळेवर निधी वितरीत होत नसल्यामुळे अनेक औषधी पुरवठादारांनी बºयाच वेळा नाराजी व्यक्त केली. इतकेच नव्हे तर त्यांनी औषधी पुरवठादेखील रोखला होता, अशी माहिती या वेळी देण्यात आली.कारणे दाखवा नोटीसकामातील अनियमतितेमुळे पाटील यांच्याबाबत विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी तक्रारी केलेल्या आहेत. या सोबतच आठवड्यातून दोन दिवस लेखा व्यवस्थापक म्हणून त्यांना जिल्हा रुग्णालयात हजर राहण्याच्या सूचना असतानाही ते अनुपस्थित राहत असल्याच्या कारणावरून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या असल्याची माहिती डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव