शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार निवारण समितीवरील चेअरमन यांची नेमणूक रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीच्या चेअरमन यांची नेमणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी ...

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीच्या चेअरमन यांची नेमणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी एनमुक्टो संघटनेच्या वतीने प्रभारी कुलगुरुंकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तक्रार निवारण समितीचे चेअरमन हे विद्यापीठ कायद्यानुसार निवृत्त जिल्हा न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असावेत. पण, विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीच्या चेअरमन कौटुंबिक न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आहेत. त्या जिल्हा न्यायाधीश नसल्यामुळे त्यांची नेमणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच नेमणूक रद्द न केल्यास संघटनेच्या वतीने आंदोलन करण्‍यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर समितीत अधिष्ठाता पी.पी. छाजेड यांचा समावेश आहे. मात्र, ते नियमित निवड झालेले अधिष्ठाता नसल्यामुळे त्यांचीदेखील नेमणूक रद्द करण्यात यावी, अशीही मागणी करण्‍यात आली आहे.

==

सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी समिती

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा बदल्यांसाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहे. त्याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने एक समिती नियुक्त केली आहे. या समितीत पाच जणांचा समावेश आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार नव्या मॉडेलसाठी अर्थात संगणकीय प्रक्रियेसाठी लागणारे अंदाजपत्रक तयार करून ते तात्काळ राज्य शासनाकडे पाठवावे लागणार आहे. शिवाय निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी महाआयटी, सी-डॅक, एनआयसी यांची मदत घेतली जाईल. सॉफ्टवेअर तयार केल्यानंतर त्याची यशस्वीपणे चाचणी केल्यानंतरच प्रत्यक्ष वापर केला जाईल. यासाठी सदर समितीला महिनाभराची मुदत देण्यात आली आहे. नव्या मॉडेलमध्ये पारदर्शकता आणि सुरक्षितता या दोन महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले जाणार आहे. दरम्यान, ३० जूनपर्यंत शिक्षक बदलीप्रक्रियादेखील स्थगित करण्‍यात आली आहे.