रोटरीतर्फे पीपीई किट वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 14:39 IST2020-05-01T14:27:27+5:302020-05-01T14:39:44+5:30
रोटरी क्लबतर्फे पी पी ई किट वाटप करण्यात आले.

रोटरीतर्फे पीपीई किट वाटप
रोटरीकडून भुसावळ, दीपनगर, वरणगाव येथे पीपीई किटचे वाटप
भुसावळ, जि. जळगाव : रोटरी क्लब नेहमीच समाजाच्या हितासाठी झटत असते. सध्याच्या कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी पीपीई किट अत्यंत आवश्यक असते. ही गरज ओळखून रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० यांनी नागपूर ते नाशिक या त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर हे किट मागवले. त्यातून भुसावळ येथे असिस्टंट गवर्नर चेतन पाटिल यांच्याकडे एकूण ४० किट भुसावळसाठी प्राप्त झाले.
भुसावळमधील चारही क्लब रेलसिटी, रोटरी मेन, ताप्तीव्याली, रॉयल्स यांच्यावतीने त्यांचे वितरण शुक्रवारी असिस्टंट गव्हर्नर चेतन पाटील आणि रोटरी रेलसिटीचे अध्यक्ष अनिकेत पाटील यांनी केले. सदर किट भुसावळ नगरपालिका दवाखाना-२४ , दीपनगर हॉस्पिटल -५, डीवाय. एस. पी. कार्यालय-५ , वरणगाव हॉस्पिटल -५, रेल्वे हॉस्पिटल-१ असे वितरीत केले .