भडगाव तालुक्यातील भोरटेक येथे आरोग्य शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 18:11 IST2019-01-20T18:06:15+5:302019-01-20T18:11:16+5:30

भोरटेक, ता.भडगाव येथे २० रोजी जवाहर मेडिकल फाउंडेशन व भोरटेक ग्रामपंचायत यांच्यातर्फे आयोजित आरोग्य शिबिरात ५०० रुग्णांची तपासणी करण्यात आली.

Camp at Kajgaon in Bhadgaon taluka | भडगाव तालुक्यातील भोरटेक येथे आरोग्य शिबिर

भडगाव तालुक्यातील भोरटेक येथे आरोग्य शिबिर

ठळक मुद्देशिबिरात ५०० रुग्णांची आरोग्य तपासणीविनामूल्य तपासणी व औषधोपचारही

कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : भोरटेक, ता.भडगाव येथे २० रोजी जवाहर मेडिकल फाउंडेशन व भोरटेक ग्रामपंचायत यांच्यातर्फे आयोजित आरोग्य शिबिरात ५०० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
संतोष धनगर, गंभीरराव देशमुख, देवकाबाई महाजन यांच्या स्मरणार्थ आयोजित शिबिराच्या अध्यक्षस्थानी वासुदेव बच्छे होते. शिबिरात अस्थीरोग, युरोलॉजी, बालरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग आदी विविध रोगांची तज्ज्ञ डॉक्टरांनी ही तपासणी केली व औषधे वाटप केली.
याप्रसंगी डॉ.कुणाल काळे, डॉ.विशाल साळवे, डॉ.उर्जिता, डॉ.गंजीधर पाटील, डॉ.अविनस, डॉ.आदित्य व विनोद पवार यांनी विविध रोगाने त्रस्त रुग्णांची तपासणी करीत औषधोपचार केले. याप्रसंगी भोरटेकचे सरपंच उमेश देशमुख, वि.का.सोसायटी चेअरमन अनिल महाजन, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र धनगर, मंगा भिल, भोरटेकचे पोलीस पाटील राजेंद्र महाजन, शिवसेना शाखाध्यक्ष सुनील महाजन, शेतकरी नेते अशोक देशमुख, माजी सरपंच गोविंदा महाजन, कमलशांती पतसंस्था चेअरमन प्रमोद ललवाणी, कजगावचे भडगाव तालुका समता परिषदेचे तालुकाध्यक्ष भानुदास महाजन, प्रमोद पवार, नितीन सोनार, संजय महाजन, नाना पाटील, दीपक महाजन, सुनील बछे, संदीप पाटील, प्रभाकर महाजन, सुकलाल महाजन, संजय महाजन यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Camp at Kajgaon in Bhadgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.