शिरसमणी येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 22:15 IST2019-10-02T22:14:57+5:302019-10-02T22:15:08+5:30

पारोळा : शिरसमणी येथे मंगळवारी रात्री धोंडू लोटन भोसले यांच्या शेतात बिबट्याच्या हल्ल्यात एका वासराचा मृत्यू झाला. गेल्या दोन-तीन ...

Calf killed in Shibamani attack | शिरसमणी येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

शिरसमणी येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार



पारोळा : शिरसमणी येथे मंगळवारी रात्री धोंडू लोटन भोसले यांच्या शेतात बिबट्याच्या हल्ल्यात एका वासराचा मृत्यू झाला.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून शिरसमणी येथील सुधाकरनगर शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे शेतक-यांनी सांगितले. वन विभागाच्या कर्मचा?्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याचे अधिका?्यांनी सांगितले. तसेच शेतकरी धोंड लोटन भोसले यांनी रात्री शेतात झोपायला गेले असताना प्रत्यक्ष बिबट्या वासराला उचलून नेत असताना पहिले.
घटनास्थळी वनपाल सरोज मोरे यांनी याबाबत कळविले असून परिसरात कॅमेरे बसवले जातील, असे सांगितले.

Web Title: Calf killed in Shibamani attack