जळगाव : शहरात चोरी व घरफोडीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. पुण्यात पतीच्या उपचारासाठी गेलेल्या ज्योती आत्माराम गायकवाड (वय ५८) या सेवानिवृत्त शिक्षिकेच्या टेलिफोन नगरातील घरात चोरट्यांनी कुलूप तोडून चांदीचे दागिने, भांडी व कपडे लांबविले, तर वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेलेल्या संजय प्यारपाणी यांच्या गणपतीनगरातील घरातही चोरट्यांनी हात साफ केला आहे, मात्र त्यांच्याकडे काय ऐवज चोरी गेला हे ते आल्यावरच स्पष्ट होईल.टेलिफोननगरातील ज्योती गायकवाड या पतीच्या उपचारासाठी पुणे येथे मुलाकडे गेल्या होत्या. सोमवारी दुपारी त्यांच्याकडे झाडांना पाणी देण्यासाठी एक महिला आली असता त्यांना कडीकोयंडा व कुलूप तुटलेले दिसले. चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी गायकवाड यांना फोनवरून माहिती दिली. त्यानुसार गायकवाड या मंगळवारी शहरात दाखल झाल्या. घरात काय वस्तू चोरी झाल्या याची पाहणी केली असता चांदीचे भांडे, पितळी भांडे, साड्या व घड्याळ असा २५ हजारांचा ऐवज चोरी झाल्याचे लक्षात आले. घरात रोख रक्कम नव्हती. वस्तूंची खात्री पटल्यानंतर गायकवाड यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. गुन्हा दाखल करण्यात आला. हेड कॉन्स्टेबल विनोद शिंदे तपास करीत आहेत.गणपतीनगरात गुरुनानक सोसायटीतील संजय प्यारपाणी या व्यापाऱ्याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविला आहे. नेमका काय व किती ऐवज चोरीस गेला हे स्पष्ट झालेले नाही. प्यारपानी यांचे फुले मार्केटला दुकान आहे. १८ सप्टेंबर रोजी ते परिवारासह वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेले आहेत. विजय जेठूमल प्यारपाणी हे मंगळवारी त्यांच्या घराकडे गेले असता त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी रामानंदनगर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.
जळगावात व्यापारी व सेवानिवृत्त शिक्षिकेकडे घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 16:09 IST
जळगाव शहरात चोरी व घरफोडीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. पुण्यात पतीच्या उपचारासाठी गेलेल्या ज्योती आत्माराम गायकवाड (वय ५८) या सेवानिवृत्त शिक्षिकेच्या टेलिफोन नगरातील घरात चोरट्यांनी कुलूप तोडून चांदीचे दागिने, भांडी व कपडे लांबविले
जळगावात व्यापारी व सेवानिवृत्त शिक्षिकेकडे घरफोडी
ठळक मुद्देगणपती व टेलिफाननगरातील घटनावैष्णोदेवीच्या दर्शनाला गेले अन् संधी साधलीरामानंद नगर पोलिसांनी दिली घटनास्थळी भेट