विजेची ठिणगी पडल्याने ज्वारी जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 21:55 IST2020-11-02T21:55:38+5:302020-11-02T21:55:44+5:30
पन्नास हजाराचे नुकसान

विजेची ठिणगी पडल्याने ज्वारी जळून खाक
कळमसरे, ता.अमळनेर : येथील शशिकांत देविदास बडगुजर याच्या शेतातील ज्वारी कणसांच्या ढिगाऱ्यावर विद्युत तारेची मोठ्या प्रमाणात पार्कींग होऊन ठिणगी पडल्याने दोन एकर शेतावरील ज्वारी जळून खाक झाली. यात शेतकऱ्याचे सुमारे पन्नास हजाराचे नुकसान झाले.कळमसरे शिवारातील तांदळी रस्त्यालगत गट नं. ४५०/२ या दोन एकर क्षेत्रात शशिकांत बडगुजर याने पिक कर्जातून यंदा प्रथमच ज्वारी पिकाचा पेरा केला होता. ज्वारी कापणी करून कणसांचा ढेर वाळल्यानंतर एका ठिकाणी गोळा करून वरून कापडाने झाकून दिले होते. सकाळी थ्रेशर मशिनने ज्वारी काढणार होता. परंतु संध्याकाळच्या सुमारास ज्वारी ढेराच्या वरून गेलेल्या उच्च अश्वशक्तीच्या विज वाहिनीच्या तारांवर पक्षांचा थवा बसताच मोठ्या प्रमाणात पार्कींग होऊन ठिणग्या पडताच ज्वारीने पेट घेतला. शेतात कोणीच नसल्याने सुदैवाने प्राणहानी झाली नाही. ही घटना कळमसरे विज उपकेंद्रास कळविल्यावर कर्मचाऱ्यांनी पाहणी करून वरिष्ठांना कळविले.