शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

हाजी गफ्फार मलिक यांच्या पार्थिवावर दफन विधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी दफनविधी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी दफनविधी करण्यात आला. ईदगाह मैदान परिसरातील कब्रस्तानात त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

हाजी गफ्फार मलिक यांचे सोमवारी रात्री १० वाजता ह्रदय विकाराने निधन झाले. त्यानंतर मंगळवारी दुपारी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी काट्याफाईल शनिपेठमधील मस्जिद ए नुरमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत जनाजा ए नमाज अदा करण्यात आली. मौलाना उस्मान यांनी नमाजचे पठण केले. त्यानंतर घाणेकर चौकापर्यंत त्यांची अंत्ययात्रा पायीच नेण्यात आली. त्यानंतर गाडीने ईदगाह मैदानापर्यंत आणण्यात आली. ईदगाह आणि कब्रस्तानाला दोन वेळा फेरी मारल्यानंतर जनाजा ए नमाज पुन्हा अदा करण्यात आली. यावेळी मौलाना अति कुर रहमान यांनी नमाज पठण केले. त्यानंतर त्यांचा दफनविधी पार पडला. त्यांचे पुत्र एजाज मलिक, नदीम मलिक, फैसल मलिक यांनी हे अंतिम विधी पार पाडले. यावेळी त्यांच्यावर प्रेम करणारे व त्यांचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरद पवार यांनी केले ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करून आपल्या संवेदना व्यक्त केल्या. पवार यांनी ट्विट केले की, अल्पसंख्याक सेलचे माजी राज्य प्रमुख गफ्फार मलिक यांचे निधन दु:खदायक आहे. राजकीय क्षेत्रातील संयत तरीही आग्रही नेतृत्व त्यांच्या जाण्याने हरपले. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना आणि श्रद्धांजली

मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सकाळी निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांजवळ शोकसंवेदना व्यक्त केल्या. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही ट्विटर वरून शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील, आमदार शिरीष चौधरी, महापौर जयश्री महाजन, मनपाचे विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, भगत बालाणी, राजीव पाटील, शरद तायडे, मनियार बिरादरीचे फारूख शेख, सुनिल माळी यांनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या.