शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला चाकूचा धाक दाखवून घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 23:46 IST

महेश छाजेडनगरात अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून महिलेला चाकूचा धाक दाखवून तब्बल १ लाख १६ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली.

ठळक मुद्देएक लाख सोळा हजारांचे दागिने लंपास : डीवाएसपींची धाव

लोकमत न्यूज नेटवर्क

पहूर, ता. जामनेर : पहूरअंतर्गत असलेल्या  पाचोरा रस्त्यावरील महेश छाजेडनगरात अज्ञात चोरट्यांनी  घरात घुसून  महिलेला चाकूचा धाक दाखवून तब्बल १ लाख १६ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवारी  मध्यरात्री घडली. याप्रकरणी पहूर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरूद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भागवतराव गायकवाड हे महेश छाजेड नगरातील रहिवासी आहेत. बुधवारी मध्यरात्री भागवत गायकवाड यांच्या पत्नी भारतीबाई या  शौचावरून घरात प्रवेश करीत असताना घराच्या मागील बाजूस दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी तोंडाला रूमाल बांधलेला असल्याने चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. भारतीबाई यांना चाकूचा धाक दाखवून दागिने व पैशाची बतावणी केली. महिला घाबरल्याने किचन ओट्याखाली ठेवलेला डबा चोरट्यांना दिला. यातील ३ ग्रॅम वजनाचे १२ हजार किमतीचे डोरले, २४ हजार किमतीचे सहा ग्रॅमचे पदक, १६ हजार रुपयांचे चार ग्रॅम वजनाचे वेल, ४० हजारांचा दहा ग्रॅम वजनाचा नेकलेस, दोन ग्रॅम वजनाचे आठ हजार किमतीच्या दोन नथ असे एक लाख सोळा हजार वजनाचे दागिने लंपास केले.

माहिती मिळताच घटनास्थळी पाचोरा विभागाचे डीवाएसपी भारत काकडे, पोलीस निरीक्षक राहुल खताळ, शशिकांत पाटील व श्रीराम धुमाळ यांनी पाहणी केली. 

घटनेनंतर महिला बेशुद्ध गळ्याला चाकू लावून तोंड दाबल्यामुळे महिलेला चोरट्यांचा प्रतिकार करता आला नाही. चाकू दाखविल्याने सोन्याचे दागिने काढून द्यावे लागले. पती भागवत गायकवाड घरात झोपलेले होते. त्या महिलेला आरडाओरड करण्यासाठी संधी मिळाली नाही. चोरट्यांनी पळ काढल्यानंतर महिला  घाबरल्याने बेशुद्ध स्थितीत पडून होती. सकाळी पती उठल्यावर हा प्रकार उघडकीस आला.पोलीस कर्मचारीसंख्या तोकडी असल्याने घडलेल्या घटनांचा तपास उघडकीस येण्यासाठी अडचणी येत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावJamnerजामनेरThiefचोरCrime Newsगुन्हेगारी